नाशिक

कुसुर व आडसुरेगावला आगीत ३५ ट्रॉली चारा जळून खाक

CD
पान-१ --------------- आगीत ३५ ट्रॉली चारा जळून खाक कुसुर, आडसुरेगावला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; एक जण गंभीर सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : कुसुर व आडसुरेगाव या दोन गावांमध्ये चाऱ्याला आग लागून सुमारे ३५ ट्रॉली चारा जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कुसूर येथे गुरुवारी (ता.१२) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. येथील शेतकरी दौलत गायकवाड यांनी जनावरांसाठी मका व बाजरीचा सुमारे २५ ट्रॉली चारा विकत घेऊन साठवून ठेवला होता. मात्र, अचानक शॉर्टसर्किटमुळे या चाऱ्याला आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण चारा भस्मसात झाला. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून साठवलेला चारा डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने गायकवाड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. युवा नेते संभाजी पवार यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. चाऱ्याला आगीच्या घटना वाढत चालल्या असून प्रशासनाने दुष्काळात शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन अशा आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संभाजी पवार यांनी केली. दुसरी घटना गुरुवारी(ता.१२) रात्री आठच्या सुमारास आडसुरेगाव येथे घडली. येथील शेतकरी सुनील पोपटराव चव्हाण यांचा सुमारे १० ट्रॉली मका चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. चाऱ्याला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला. आग विझविण्याचा प्रयत्न करताना किशोर चव्हाण हे गंभीररीत्या जखमी झाले. ------------ या दोन्ही घटनांमध्ये एकूण सुमारे ३५ ट्रॉली चारा जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना जनावरांसाठी साठवलेला चारा आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. शासनाने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT