The commotion after the firecrackers of Jawan cinema at Kamaldeep cinema hall  esakal
नाशिक

Malegaon Jawan Movie : मालेगावाच कमलदीप सिनेमागृहात गोंधळ; जवान चित्रपट सुरू असताना फटाक्यांची झाली आतषबाजी

सकाळ वृत्तसेवा

Malegaon Jawan Movie : शहरातील कुसुंबा रस्त्यावरील कमलदीप चित्रपटगृहात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटावेळी अखेरच्या खेळाला फटाक्यांची आतषबाजी झाल्याने प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

शुक्रवारी (ता. ६) रात्री नऊ ते बारादरम्यानच्या खेळाला हा प्रकार घडला. तब्बल दहा मिनिट फटाके व सुतळी बॉम्बची आतषबाजी सुरु असल्याने अखेर चित्रपटाचा खेळ बंद करावा लागला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ( firecrackers during jawan movie in malegaon cinema theatre nashik news )

रमजानपुरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. सिनेमागृह मालकाने तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झालेला नाही असे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

तथापि घटना घडल्यानंतर क्षणातच पोलिस सिनेमागृहात पोहोचले. कासिम मोहम्मद इब्राहीम (२५, रा. म्हाळदे शिवार) या तरुणाजवळ फटाके आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. कासिमवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे श्री. रोही यांनी सांगितले. जवान चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे.

काल अखेरचा खेळ सुरु झाल्यानंतर चित्रपटातील गाणे सुरु होताच अचानक आतषबाजी सुरु झाली. यामुळे शेकडो प्रेक्षक उठून उभे राहिले. मोठा गोंधळ उडाला. शुक्रवार सुटीचा दिवस असल्याने चित्रपटाला मोठी गर्दी होती.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवडे विविध सिनेमागृहांमध्ये बंदोबस्त होता.

आता फिवर कमी झाल्याचे समजून पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला असतानाच हा प्रकार घडला. सिनेमागृहात फटाक्यांच्या आतषबाजीतून एखाद्यावेळी मोठी गंभीर दुर्घटना होवू शकते. यासाठी अति उत्साही प्रेक्षकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.

काळजी घेण्याची गरज

एखादा जोरदार सिन वा गाण्याला हुल्लडबाजी करण्याचा व फटाके फोडण्याचा प्रकार घडतो. सिनेमागृह मालक व पोलिस प्रशासनाने यासाठी खबरदारी घ्यावी, अन्यथा अनर्थ ओढवू शकतो. दिल्ली येथील उपहार सिनेमागृहात १३ जून १९९७ ला लागलेल्या आगीत ५९ जणांचा बळी गेला होता. ही घटना अद्यापही अनेकांच्या स्मरणात असून त्याच्या जखमा न विसरता येण्योजोग्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT