Sahitya Sammelan 
नाशिक

कविसंमेलनात गर्दी कमी, दर्दी जास्त; रसिकांनी अनुभवल्या सरस कविता

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक - येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन मोठ्या उत्साहात होत आहे. या निमीत्ताने साहित्यप्रेमी सम्मेलनस्थ ळास भेट देत आहेत, दरम्यान आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरा कवींच्या कवीता वाचन मेजवाणीचा रसीकांना आस्वाद घेता आला. वाढत्या थंडीत देखील मिळालेला प्रतिसाद पाहाता कविसंमेलनास गर्दी कमी पण दर्दी जास्कत अशी स्थिती होती.

दरम्यान उद्घाटनाच्या दिवशी आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात अनेकांनी मानवी जीवनाचे सार दर्शवणारे काव्य सादर केले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे विदारक अवस्थेत आसलेल्या बळीराजाचे चित्र विदर्भ अकोला येथील कवी गजानन मानकर यांनी डोळ्यासमोर उभे केले ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

माझे जिवीची आवडी या शब्द-काव्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात न्हाऊन निघालेल्या रसिकांनी उदघाटनाच्या दिवशी, जीवनातील दुःखाचे विदारक सत्य शब्दबद्ध करणाऱ्या कवींच्या कवी संमेलनास अंमळ कमी गर्दी केल्याचे दिसून आले. या कवी संमेलनात पारंपरिक पद्धतीला छेद देत अध्यक्ष श्रीधर नांदेडकर यांनी प्रथमतः आपली रचना सादर केली आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने कवी संजय चौधरी यांनी अवि रसिकांना खिळवून ठेवले होते.

"जीवास माझ्या करून अर्पण वंदे मातरम् म्हणतो मी देव आहे देश माझा तिरंग्या ला पुजतो मी" या कवी विष्णु सोळंकी यांनी सादर केलेल्या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. रंगलेल्या या सुरुवातीच्या अर्ध्या तासानंतर रंगलेल्या या कविसंमेलनात एकापेक्षा एक अशा सरस कविता सादर करण्यात आल्या.

कविसंमेलन अधिकाधिक बहरत गेले या कविसंमेलनात राज्यातील दगडू लोमटे सय्यद अलाउद्दीन रवी कोरडे धारूरकर मनोज बोरगावकर मनोज पाठक माधवी माधवी गोरे मुठाळ प्रशांत केंदळे विष्णू थोरे प्रतिभा जाधव गीते शिंदे वाल्मीक वाघमारे संजय कृष्णाजी पाटील कवी कमलाकर देसले संदीप जगताप रेखा भांडारे सुषमा ठाकूर विष्णू थोरे संगीता धायगुडे सुशीला संकलेचा आदींनी सहभाग घेतला होता. हे कवी संमेलन उत्तरोत्तर बहरत गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT