esakal
esakal
नाशिक

Rare Birds: कान्हा अभयारण्यात पिवळ्या पायांच्या बटन लावाचे पहिले छायाचित्रे! सर्वेक्षणात आढळला पक्षी

आनंद बोरा :सकाळ वृत्तसेवा

Rare Birds : वेळ सकाळची...स्थळ : मध्यप्रदेशातील वाघांचे कान्हा राष्ट्रीय उद्यानातील जंगल खेडा.

पक्षी निरीक्षणावेळी गवताळ परिसरात पाण्याच्या नाल्याजवळ पिवळ्या पायांचा बटन लावा पक्ष्याची जोडी दिसली.

तासभर न हालता उभे राहिल्यावर पक्षी गवताबाहेर आले आणि छायाचित्रकार आनंद बोरा यांनी आपल्या कॅमेऱ्यात पक्ष्याचे पहिले छायाचित्र टिपले. (First Pictures of Yellow footed Button Lava in Kanha Sanctuary bird found in survey nashik news)

मध्यप्रदेशामध्ये दुर्मिळ पिवळ्या पायांचा बटन लावा पक्ष्याचा आवाज ऐकायला मिळत होता. प्रत्यक्षात त्याचे छायाचित्र मिळाले नव्हते. या छायाचित्रामुळे मध्यप्रदेशात हा पक्षी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

बोरा यांनी अभयारण्यात सिरकीर, माल्कोहा, चेस्टनट सिरी, मिनीवेट, ब्राऊन फिश आऊल, रातवा, शामा आदींसह साठ जातींच्या पक्ष्यांची नोंद केली. त्याची दखल ई-बर्डने घेतली. निमित्त होते. कान्हामध्ये वनविभाग आणि डब्ल्यूएनसीतर्फे झालेल्या दुसऱ्या पक्षी सर्वेक्षणाचे.

त्यामध्ये देशात नव्वद पक्षी अभ्यासक सहभागी झाले होते. वाघाच्या जंगलात पायी फिरून पक्षी गणना करण्यात आली. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ९४० चौरस किलोमीटर इतके आहे.

घनदाट जंगले आणि गवताळ प्रदेशासाठी हे अभयारण्य ओळखले जाते. वाघ, बिबट्या, जंगली श्‍वान, गवे, हरिण यासह पक्ष्यांच्या ३५० हून अधिक जाती इथे पाहावयास मिळतात.

सर्वेक्षणात एका चौकीवर दोन पक्षी अभ्यासक, एक वनरक्षक, एक वन मजूर यांनी एकत्रित पक्षी निरीक्षण केले. पहाटे पाच ते दुपारी बारा आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहापर्यंत पक्षी निरीक्षण झाले. जैवविविधतेने नटलेल्या कान्हा अभयारण्यात दुर्मिळ पक्ष्याला पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद करता आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लाजाळू पक्षी

पिवळ्या पायांचा बटन लावा हा पक्षी लाजाळू असून तो गवताळ आणि खुरट्या वनात आढळतो. तो सहसा दिसत नाही. हा पक्षी कोंबडीच्या पिल्ला एवढा आहे. इंग्रजीत त्याला ‘यलो लेग्ड बटन क्वाइल’ असे म्हटले जाते.

मादी नरापेक्षा अधिक सुंदर आणि आकाराने मोठी असते. तिला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंदा पट्टा असतो. पाय व चोच पिवळी जर्द असते आणि हीच तिची ओळख ठरते. उडताना तिची नारंगी तांबूस गळपट्टा, छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो. नराला गळपट्टा नसतो व रंगाने फिकट असतो.

पावसाळा हा त्यांचा विणीचा काळ असतो. या काळात मादी नराला अन्न पुरवते. अंडी घातल्यावर मादी नरावर अंडी उगवण्याची जबाबदारी देत निघून जाते. लावा पक्ष्याप्रमाणे त्याचा पायाला चौथे बोट नसते. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना ‘बस्टर्ड क्वाइल’ गटात गणले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT