female speaker.jpg 
नाशिक

७२ वर्षांच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच 'ती'ने भूषविले महिला सभापतिपद...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (लासलगांव) बहात्तर वर्षाच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच आशिया खंडातील नावाजलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून 29 ऑगस्ट 2019ला सुवर्णा जगताप सभापती पदावर विराजमान झाल्या. कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समितीत पेपरलेस कामकाजाच्या माध्यमातून बाजार समितीच्या नावलौकिकात भर पाडण्याचा मानस आहे.

कॅशलेश व्यवहारासाठी बाजार समितीच्या माध्यमातून त्या प्रकारचे सॉफ्टवेअर

संपूर्ण शिक्षण पुणे येथे झालेल्या सुवर्णा जगताप या संगणक अभियंता असून या अनुभवाच्या शिदोरीवर लासलगाव येथील गणेश चारिटेबल ट्रस्टच्या सचिव आहेत. आपले पती जि.प. सदस्य डी. के. नाना जगताप यांच्या दीप कन्स्ट्रक्शन व ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन, तसेच ऐश्वर्या वॅाश सॅडक्रेशर प्लॅटचे काम समर्थपणे बघत आहे.
रोजचे चार कोटीची उलाढाल असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान कारभार यावर त्यांचा कटाक्ष आहे. त्या  शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून शेतीमाल विकल्यानंतर 24 तासात N.E.F.T द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. कॅशलेश व्यवहारासाठी बाजार समितीच्या माध्यमातून त्या प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित केले.

शेतकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी प्लांट उभारणार

केंद्र शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत "संगणीकृत लिलाव पद्धती" यासाठी राज्यात लासलगाव बाजार समितीची निवड ही अभिमानाची बाब आहे. तीन टर्मचा प्रदिर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असतांना शेतकऱ्यांना भविष्यात कोणकोणत्या अडचणी येणार आहे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीयीकृत बँकेचे ए.टी.एम. या सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना उपयोगी असलेले पोकलेन मशीन "डिझेल टाका व वापरा" या तत्त्वावर उपलब्ध करून देणार आहे. माती व पाणी परीक्षण केंद्राची उभारणी बाजार समितीच्या आवारात करणार असून लासलगाव, निफाड विंचूर बाजार समिती शेतकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी प्लांट उभारणार आहे.

पावसाळ्यात कांदा व धान्य व भाजीपाला यांच्या लिलावास अडचण येऊ नये म्हणून लासलगाव, विंचूर ,निफाड येथे तीन मोठ्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे.
सन 2018--2019 या आर्थिक वर्षांत बाजार समितीत 76,92,580 क्विंटल शेतीमाला ची आवक झाली असुन 6,43,59,91,997 रूपयांची उलाढाल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT