corona-virus 235.jpg
corona-virus 235.jpg 
नाशिक

चिंताजनक : नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आता १२ वर ..कोरोनाचे संकट जिल्ह्यात अधिक गहिरे..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मालेगाव मध्ये नव्याने आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात एक चांदवड येथील रहिवासी असून नाशिकमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 12 वर पोहचली आहे. तसेच त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. या कोरोना बाधितांमध्ये मालेगावी 9 तर नाशिकला दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे पाठोपाठ  नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे
मुंबई-पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले असून गुरुवारी (दि.८) मालेगाव येथील एकाचा कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. याशिवाय, मालेगाव शहरातीलच ९ संशयितांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हादरली. . कोरोनाबाधितांमधील बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदीवरुन आल्याचे सांगितले जाते. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ६७ संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात आता आणखी ९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच एका कोरोना संशयिताचा बुधवारी (दि.८) सकाळी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. त्याचा दफनविधी पार पडल्यानंतर सायंकाळी त्याच्या स्वॉबच्या नमुन्याचा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने पहिला बळी गेला आहे. याशिवाय, अन्य सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ९ संशयितांचेही नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पुरती हादरली आहे. नाशिक जिल्ह्णात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या दोन होती. त्यात आता मालेगावमधील ९ आणि नाशिकला दोन, त्यापैकी एकाचा मृत्यू असे एकूण १२ रुग्ण असल्याचे आढळले. यामुळे मालेगाव उत्तर महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट बनणार आहे.

मालेगावमधील कोरोना बाधित रूग्णांपैकी महेवीनगर येथील सत्तावीस वर्षीय रूग्णाचे मरकज कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. तर उर्वरीत रूग्ण मोमीनपूरा, नयापूरा भागातील आहेत. या पार्श्वभूमीवर शहराचा संपूर्ण पूर्व भाग कवेत येणार असून  प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ.उडणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT