The vipassana center here is lost in the fog esakal
नाशिक

Nashik Monsoon Fog: इगतपुरीत पसरली धुक्याची चादर! कसारा घाटात दाट धुक्यामुळे वाहतूक संथगतीने

पोपट गवांदे

Nashik News : तालुक्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तीन दिवसांपासून जोरदार पावसात सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. २७) जोरदार पावसाबरोबरच दाट धुके पसरले होते.

अगदी दिवसाही २० फुटापर्यंत असलेल्या वास्तू, वाहने नीट दिसत नव्हते. त्यामुळे कसारा घाटात दिवसभर वाहतूक संथ गतीने सुरु होती. (fog spread in Igatpuri Traffic at Kasara Ghat slow due to dense fog Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटात तर जास्तच धुके पसरले होते. जागोजागी डोंगरावरून पडणाऱ्या पाण्यामुळे धबधबेही निर्माण झाले असून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावरील नवीन कसारा घाट व मुंबईहून नाशिकला येणाऱ्या जुन्या कसारा घाटात दाट धुके पडत असल्याने दिवसाही वाहनांना हेड लाइट लावूनही समोरील वाहने नीट दिसत नव्हते. या धुक्यामुळे कसारा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

शहर परिसरात धुक्याची चादर दिवसभर पसरली होती. पावसाबरोबर सकाळीच धुक्याचा लपंडाव अनुभवास मिळत आहे. पाऊस आला, की धुके गायब होते आणि धुके आले, की पाऊस गायब होते. शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र सुद्धा धुक्यात हरवले होते. राममंदिर, तीन लकडी, भजनी मठ, रेल्वे स्टेशन, आग्रा रोड परिसर धुक्यात हरवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT