Iron cupboards broken by unknown thieves and household items in disarray esakal
नाशिक

Nashik Crime: कनाशीत जबरी घरफोडी; पावणेदोन लाखाचा ऐवज चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : कनाशी (ता.कळवण) येथे शनिवारी (ता.१०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी घरफोडी करत एक लाख ७८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या घरफोडीत श्रीराम देवस्थानाचे प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांचे मूर्तीचे सुमारे २ किलो वजनाचे चांदीचे तीन मुकुटाचा समावेश आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Forced burglary in Kanashi 2 lakh stolen Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कनाशी येथील कैलास जगन्नाथ गायकवाड यांच्या घराच्या दरवाजाचे शनिवारी रात्री चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत कपाटातील सोन्याच्या दागिनेसह आठ हजार रोख रक्कम व कनाशी श्रीराम देवस्थानाचे प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांचे मूर्तीचे सुमारे २ किलो वजनाचे चांदीचे तीन मुकुट असा सुमारे एक लाख ७८ हजाराचा मुद्देमाल लंपास केले आहे.

चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी या चोरीचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक येथील श्वानपथक पाचारण करण्यात आले. श्‍वान यांनी एटीएम मशिनपर्यंत माग काढला.

मात्र पुढे ते थांबले. श्री. गायकवाड यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी नरेंद्र रामराव जाधव व राजेंद्र हरिश्चंद्र निकम यांच्या घराचे दरवाजाचेही कडीकोंडके तोडून आत प्रवेश केला. पण येथे त्यांना मुद्देमाल मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Deal : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला झटका ! अमेरिका-इराण अंतिम करार आता 'या' देशात होणार

Pune Railway: कन्फर्म तिकीट मिळणे कठीण! पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी; तत्काळ कोटा काही सेकंदातच ‘हाउसफुल्ल’

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

रजोनिवृत्ती

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठाच्या भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार

SCROLL FOR NEXT