qurantine from delhi.png
qurantine from delhi.png 
नाशिक

#COVID19 : दिल्लीतून नाशिकला परतलेल्या 'त्या' १४ जणांचा अखेर शोध लागलाच...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिल्ली येथून नाशिकमध्ये परतलेल्या 14 जणांचा शोध लागला असून, यातील एक विद्यार्थिनी तिच्या घरातच, तर उर्वरित 13 जणांना तपोवनातील महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. दिल्लीतून 21 जण आल्याची चर्चा असल्याने याबाबत पोलिस प्रशासनाने शोध घेतला असता सात जण परराज्य व परजिल्ह्यातील आहेत. यंत्रणेला 14 जणांना शोधण्यात यश आले आहे. नाशिक शहर-जिल्ह्यात 32 जण आल्याची चर्चा होती. यातील 11 जण मालेगाव, येवला, निफाड आणि सिन्नर तालुक्‍यातील असल्याचे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले. 

मालेगाव, येवला, निफाड, सिन्नर तालुक्‍यातील 11 जण
दिल्ली येथे एका तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेले 32 जण नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याची चर्चा होती. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुंबईतील एका वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे पोलिस व आरोग्य यंत्रणेने शोधमोहीम हाती घेतली. दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 32 पैकी सात जण परजिल्हा व परराज्यातच असल्याचे तपासात समोर आले आहे. या सात जणांतील तिघे दिल्लीत, एक पुण्यात, एक मुंबईत, एक हरियानात, तर एक उत्तर प्रदेशात आहे. 

दिल्लीतून आलेले 14 कोरोना संशयित क्वारंटाइनमध्ये

 दरम्यान, नाशिक शहरात असलेल्या 14 जणांचा पोलिस व आरोग्य यंत्रणेने शोध घेतला. यातील सात हिंदू, तर सात जण मुस्लिम आहेत. यांच्यातील एक युवती शिक्षणानिमित्त गुडगाव येथे असते. मात्र कोरोनामुळे वातावरण दूषित झाल्याने ती 12 ते 16 मार्चदरम्यान नाशिकमध्ये आली आहे. तेव्हापासून ती होम क्वारंटाइन आहे. 12 ते 19 मार्चदरम्यान नाशिकमध्ये आलेल्या उर्वरित 13 जणांचीही आरोग्य यंत्रणेने तपासणी केली. त्यांना तपोवनातील महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलेले आहे.

यातील काही जण व्यावसायिक असून, त्याच निमित्ताने दिल्लीला गेले होते. तबलिगी जमात कार्यक्रमात केवळ तिघेच सामील झाल्याचे तपासातून समोर येत आहे. मात्र सध्या साऱ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही संशयित लक्षणे नाहीत. तरीही त्यांना तपोवनातील महापालिका रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात 11 जण असून, हे मालेगाव, येवला, निफाड, सिन्नर तालुक्‍यातील आहेत. या साऱ्यांना ग्रामीण पोलिस व आरोग्य यंत्रणेने होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT