Bombay High Court Aurangabad bench esakal
नाशिक

Nashik News : तुकडाबंदी दस्त नोंदणी पुनर्विलोकन याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जमिनीचे तुकडे खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीस विरोध करणारी राज्य सरकारची पुनर्विलोकन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली.

महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असल्यामुळे खरेदीखत नोंदण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तासोबत जोडलेला नसल्यास स्वीकारण्यात येऊ नये, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी जुलै २०२१ मध्ये जिल्हा निबंधकांना दिले होते. (Fragmentation Deed Registration Revision Petition Rejected Nashik News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

संबंधित परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी 5 एप्रिलला रद्द केले होते. या निर्णयासंबंधी राज्य शासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती.

ती याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी फेटाळली आहे. निर्णयामुळे तुकडाबंदीमध्ये अडकलेल्या मिळकत मालकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक येथील महेंद्र एकबोटे यांनी मुळ याचिकाकर्त्यां बरोबर हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

दरम्यान, राज्य शासनाने या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले असल्याने खंडपीठाने आपल्या निर्णयास चार आठवड्याची स्थगिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway Delays : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांचे प्रचंड हाल; मुंबईतील खासदारांचा दिल्लीत आवाज कमी पडतोय का?

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

Parbhani News: जिल्ह्यात मलेरियावर प्रभावी नियंत्रण; रक्त तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना

Parbhani News: सिद्धेश्वर धरणातून आज सोडणार पाणी ; पूर्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Parbhani News: खासगी शाळांतील लूट थांबणार; शुल्कवाढीवर सरकारचा कडक चाप; पालकांना कायदेशीर हक्क

SCROLL FOR NEXT