Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime : पार्टटाईम जॉबच्या आमिषाने महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवून महिलेला तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मानगर परिसरात राहणारी ३४ वर्षीय महिला ऑनलाइन पार्टटाइम जॉब शोधत असताना, टेलिग्राम ग्रुपवर मनी मेक सिम्पल या संकेतस्थळावरून त्यांना पार्टटाइम ऑनलाइन जॉब मिळाला. यासाठी संशयिताने त्यांना एका संकेतस्थळाची लिंक पाठविली. (Fraud of six half lakhs from woman on lure of part time job Nashik Crime news)

त्यावरील प्रक्रिया पार केल्यानंतर सदर महिलेला पार्टटाइम जॉब म्हणून ऑनलाइन हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या चित्रपटांना परिक्षण मार्किंग व रेटिंग देण्याचे काम होते. सुरवातीला सदर महिलेला संशयितांकडून परतावाही मिळाला.

परंतु काही दिवसांनी त्यांना रेटिंगचे पैसे मिळणे बंद झाले. त्यासाठी महिलेने संबंधित संशयितांकडे पाठपुरावा केला. त्या वेळी संशयितांनी त्यांना काही प्रक्रिया करण्यास सांगून त्यासाठी पैसे भरण्यास सांगितले.

महिलेला यापूर्वी पैसे मिळालेले असल्याने तिने विश्वास ठेवून कामाचे पैसे परत मिळण्यासाठी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे एकापेक्षा अनेक खात्यांवर पैसे ऑनलाइन जमा केले. अशारीतीने महिलेने ६ लाख ४० हजार ५४० रुपये विविध खात्यांवर जमा केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

परंतु संशयितांकडून या ना त्या कारणावरून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदर प्रकार ४ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान झाला. याप्रकरणी महिलेने नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार अज्ञात संशयितांसह ज्या खात्यांवर पैसे जमा केले, त्या खातेदारांविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दानिश मन्सूरी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT