नाशिक

२५ हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी गजू घोडके विरुद्ध गुन्हा दाखल

CD
पान-१------- ३६-२ गजू घोडकेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ------------ २५ हजाराची मागणी करत विक्रेत्यास धमकी ------------ सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता.१५ : दिवाळी सणानिमित्त कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी संशयित गजू घोडके याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शालिमार परिसरातील नेपाळी कॉर्नर येथे घडली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत संशयिताने विक्रेत्याच्या खिशातील कपडे विक्रीचे आलेले तीन ते साडेतीन हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ------------- तक्रारदार ऋतिक चंद्रकांत काशीद (भगवतीनगर, कोळीवाडा, जुने नाशिक) यांचा शालिमार येथील नेपाळी कॉर्नर परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. ७ नोव्हेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी सातच्या दरम्यान तसेच ९ नोव्हेंबरला सायंकाळी संशयित गजू घोडके याने त्यांच्याकडे येऊन २५ हजार रुपयांची मागणी केली. हप्त्याचे पैसे न दिल्यास दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने तक्रारदाराच्या खिशात असलेले कपडे विक्रीचे तीन ते साडेतीन हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ''तुला जीवे मारून त्याच्या दुप्पट पैसे वसूल करीन,'' अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शनिवारी (ता.१४) ऋतिक काशीद यांच्या तक्रारीवरून संशयित गजू घोडके यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून त्यास मंगळवार (ता.१७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

SCROLL FOR NEXT