Ganesh visarjan 2022 police force sakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शुक्रवारी (ता.९) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संवेदनशिल ठिकाणी जादा बंदोबस्त ठेवला जाणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तोंड देण्यासाठी जादा कुमक व शीघ्रकृती दलही सज्ज राहणार आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी (ता.७) आयुक्तालयात उपायुक्त, सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह विभागप्रमुखांची संयुक्त बैठक झाली. या वेळी गणेशोत्सवाचा आढावा घेऊन विसर्जन मिरवणुकीसंदर्भात कडेकोट पोलिस बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या. (Ganeshotsav 2022 Cops ready for Immersion Procession Nashik Latest Marathi News)

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, दीपाली खन्ना, अंबादास भुसारे, सीताराम गायकवाड, सोहेल शेख, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, मुंबई नाका ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले, पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह आयुक्तालय हद्दीतील अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीसाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सात निरीक्षकांसह सुमारे १५ उपनिरीक्षक आणि २५० कर्मचारी व सीमा सुरक्षा बलाची एक तुकडी असा सुमारे ८०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडू नये, यासाठी महिला पोलिसांचे एक स्वतंत्र पथक व विशेष शाखेचे कर्मचारी मिरवणूक मार्गात असणार आहेत. तर नाशिक रोडच्या मिरवणुकीसाठीही दोन उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, चार निरीक्षकांसह सुमारे १० सहायक निरीक्षक व १५० कर्मचाऱ्यांसह सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे.

श्रीं’ च्या विसर्जन मिरवणुकीत सामील होणाऱ्या गणेश मंडळांच्या वाहनांच्या तंदुरुस्तीची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून गुरुवारी (ता.८) केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी संबंधित गणेश मंडळांना त्यांची वाहने गोल्फ क्लब मैदानावर तपासणी आणण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून विसर्जन मिरवणुकीत वाहन नादुरुस्त होऊन मिरवणूक खोळंबण्याची वा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. सदरची बाब टाळण्यासाठी आरटीओकडून या वाहनांची तपासणी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC 2027 Points Table: व्हाईटवॉश तर झालाच, पण टीम इंडिया पाकिस्तानच्याही खाली घसरले; जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर राहिले

Local Megablock: एल्फिस्टनचा ब्रीज हटवण्यासाठी मध्य रेल्वेवर २३ तासांचा जम्बो ब्लॉक! पण एका अडथळ्यामुळे प्रशासनाचे काम अडचणीत; काय घडलं?

IND vs SA 2nd Test Live: भारतीय संघाचे पुन्हा 'वस्त्रहरण'! दक्षिण आफ्रिकेने २५ वर्षानंतर जिंकली कसोटी मालिका, ४०८ धावांनी जिंकले

December 2025 Holiday Trip: कुटुंबासोबत करा 'या' 8 भारतीय स्थळांची सैर, ख्रिसमस अन् नवीन वर्षाचा सेलिब्रेशन होईल खास

Sachin Gujar : मॉर्निंग वॉकला बाहर पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण अन् जीवघेणी मारहाण, अहिल्यानगर हादरलं! CCTV पाहा...

SCROLL FOR NEXT