Nashik Ganeshotsav 2022  esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : मिरवणुकीत भाविकांचा जल्लोष..!

अरूण मलाणी

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. मिरवणुकीत सहभागी होण्याविषयी तरुणाईमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला.

यावेळी ढोल ताशाचा झालेला गजर भाविकांचे लक्ष वेधत होता. तर डीजेच्या तालावर तिरकस तरुणाईने एकच जल्लोष केला. पोलिसांचाही चोख बंदोबस्त मिरवणूक मार्गावर ठेवण्यात आलेला आहे. (Ganeshotsav 2022 Devotees cheer in procession on Anant Chaturthi Nashik Latest Marathi News)

ढोल ताशाचा झालेला गजर भाविकांचे लक्ष वेधत होता
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी ११ ची वेळ दिलेली असताना सुमारे पावणे बाराला मिरवणुकीस प्रारंभ झाला . यावेळी मंत्री श्री महाजन यांनी ढोल ताशा वाजवत उत्साहात सहभाग नोंदवला.

महापालिकेच्या गणेश मंडळाला मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता. काही मिनिटांसाठी पावसाने देखील हजेरी लावली , परंतु भाविकांचा उत्साह वृद्धिंगत होत चालला होता.

सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक मेन रोड परिसर परिसरापर्यंत पोहोचलेली होती

सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक मेन रोड परिसर परिसरापर्यंत पोहोचलेली होती. यावेळी वेगवेगळ्या सामाजिक संस्था मंडळांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी भाविक व मंडळाचे स्वागत केले जात होते. तसेच ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT