WASTEDGE.jpeg
WASTEDGE.jpeg 
नाशिक

नाशिकच्या फुलेनगरमध्ये कचऱ्याची  दुर्गंधीने साथीच्या आजारांची भीती 

योगेश मोरे

नाशिक/ म्हसरूळ : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात दाट लोकवस्ती पंचवटीतील पेठ रोड परिसर यात मायको दवाखाना, फुलेनगर, नवनाथनगर, वज्रेश्‍वरीनगर पाटालगत असलेली झोपडपट्टीचा भाग येतो. येथील नागरिकांचा उदरनिर्वाह कृषी उत्पन्न बाजार समितीवर चालतो. सुरवातीला नवनाथनगर येथे एक रुग्ण आढळला. बघता बघता आकडा वाढत तो आजतागायत एकूण 128 रुग्ण झाले. यातील 56 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित करीत प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करीत पेठ रोडला बॅरिकेड्‌स लावले. फुलेनगर, मायको दवाखाना, अवधूतवाडीतील पटेल गल्ली, गजानन चौक, भराडवाडी, महाराणा प्रतापनगर, वैशालीनगर, शेषराव महाराज मंदिर, विजय चौक येथे कोरोनाबाधित आढळल्याने परिसर प्रतिबंधित करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. यात हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे प्रमाण अधिक असल्याने कमाई बंद झाली असून, घर चालणार कसे, हा गंभीर प्रश्‍न उभा राहिला आहे. 

गल्लीच्या टोकावर कचरा 
फुलेनगरमध्ये दाट लोकवस्ती असून, प्रतिबंधित केल्याने घंटागाडी आत प्रवेश करत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक रात्री गल्लीच्या टोकावर कचरा टाकतात. दिंडोरी रोडवर हौसिंग बोर्ड, अवधूतवाडी, पेठ रोड भाराड वस्तीसमोर पाटालगत रस्त्यावर कचरा टाकतात. महाराणा प्रतापनगर येथे व सम्राटनगर येथील इमारत क्रमांक एकजवळील शौचालयालगत कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, अन्य साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

"हाताने फवारणी करा' 
ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतो त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात येतो. परंतु पेठ रोड, फुलेनगर परिसर दाट लोकवस्ती असल्याने अरुंद गल्ल्या-बोळ असल्याने निर्जंतुकीकरण करणारे वाहन गल्लीत जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी हाताने फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT