Fight Between Girls in college Campus
Fight Between Girls in college Campus esakal
नाशिक

Nashik : ‘बॉयफ्रेंड’ च्या वादातून विद्यार्थिनींची फ्रीस्‍टाईल; पोलिसांकडून समज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तरुणींच्‍या दोन गटात तुफान हाणामारी झाल्‍याची घटना शुक्रवारी (ता. १८) दुपारी घडली. गंगापूर रोडवर असलेल्‍या महाविद्यालयातील कॅन्‍टीन परिसरात घडलेल्‍या विद्यार्थिनींच्‍या फ्रीस्‍टाईल हाणामारी पाहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दरम्‍यान, प्रियकराशी (बॉयफ्रेंड) निगडित वादातून भांडण झाल्‍याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तरुणींच्‍या पालकांना पाचारण करताना समज देऊन त्‍यांना सोडण्यात आले आहे. (girl Students freestyle fight over boyfriend controversy in college Premises Nashik Latest Marathi News)

नेहमीप्रमाणे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रांगण गजबजलेले असताना, अचानक तरुणींच्‍या दोन गटांमध्ये वाद झाल्‍याचे निदर्शनात आले. अवघ्या काही मिनिटात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गंगापूर रोडवरील एका महाविद्यालय प्रांगणात झालेल्‍या विद्यार्थिनीमधील ही हाणामारी पाहाण्यासाठी प्रांगणातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थिनींच्‍या गटाकडून एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता.

दरम्‍यान, महाविद्यालयात तैनात सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्‍तक्षेप करत भांडण मिटविले. हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या सरकारवाडा पोलिस ठाण्यात या तरुणींना नेताना त्‍यांच्‍या पालकांनाही पाचारण करण्यात आले. घडलेल्‍या संपूर्ण प्रकाराची माहिती पालकांना देण्यात आली व समज देऊन विद्यार्थिनींना सोडून देण्यात आल्‍याचे पोलिसांकडून सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT