नाशिक

दिवाळी सुट्टीत गिरणा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

CD
टुडे ३/ ॲंकर फोटो - AHB26B12282 गिरणा धरण: येथे झालेली पर्यटकांची गर्दी. गिरणा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी ------------------------------ विविध भागातील नागरिकांची सुट्यांमध्ये हजेरी सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १५ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची पावले विविध पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. मालेगावसह कसमादे , चाळीसगाव, नांदगाव परिसरातील नागरिकांकडून गिरणा धरण परिसराला विशेष पसंती दिली जात आहे. धरणातील विस्तीर्ण जलसाठा, सभोवतालचा निसर्गरम्य परिसर, डोंगररांगा आणि शांत वातावरण यामुळे गिरणा धरण परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्याने अनेक कुटुंबे, मित्रमंडळी, युवक सहलींचे नियोजन करीत आहेत. लांबच्या पर्यटनस्थळांवर जाण्याऐवजी जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यातूनच गिरणा धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाचे विहंगम दृश्य, पाण्याच्या सान्निध्यात घालवलेले निवांत क्षण आणि निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. अनेकजण सहलीसाठी घरून खाद्यपदार्थ घेऊन येत असून, परिसरातच वनभोजनाचा आनंद लुटत आहेत. तरुणाईकडून छायाचित्रे आणि सेल्फी घेण्यालाही पसंती दिली जात आहे. विशेषतः शनिवार व रविवार आणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिक पर्यटनाचा आनंद घेत आहेत. स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या दृष्टीने गिरणा धरण परिसराला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून चांगली ओळख मिळू शकते. कोट... गिरणा धरण उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. पर्यटनदृष्ट्या आजूबाजूचा परिसर समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढतील. - विजय इप्पर, माजी सरपंच, उंबरदे कोट... गिरणा धरण परिसरात पर्यटकांनी स्वच्छता राखावी. प्लॅस्टिक व कचरा टाकू नये. पर्यटनाचा आनंद घेताना जलाशयाजवळ सुरक्षिततेची काळजी घ्यावी. लहान मुलांची काळजी घ्यावी. - प्रशांत जगताप, शिक्षक, डॅमवस्ती कोट... गिरणा धरणाच्या आसपासचा परिसर चांगला आहे. मात्र पर्यटनदृष्ट्या धरणाकडे जाणारा रस्ता चिंचगव्हाणपासून अतिशय खराब आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासह गिरणा धरण परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. - सुरेखा पोतदार, पर्यटक, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT