NMC GIS Mapping esakal
नाशिक

NMC News : संपूर्ण शहराचे GIS Mapping पूर्ण! प्रायोगिक तत्त्वावर एका गावठाणाची माहिती संकलित करणार

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात एखादा रस्ता, प्लॉट, उद्याने, ड्रेनेजलाइन किंवा एखाद्या जागेवर अतिक्रमण झाले तर त्यासाठी जागेवर जाऊन पाहणी करणे किंवा कागदपत्रांची जमवाजमव करण्याची आता गरज भासणार नाही.

त्यासाठी महापालिकेकडून सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील वस्तीपासून रस्त्यापर्यंत व रस्त्यांखालील पायाभूत सुविधांचे जिओग्राफीकल मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

आता पुढील टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर एक गावठाण निश्चित करून मॅपिंगवर डाटा संकलित करण्याचे काम होणार आहे. पुढील दीड वर्षात नाशिककरांना एका क्लिकवर विविध प्रकारची माहिती उपलब्ध होईल. (GIS Mapping of entire city complete Information of one village will collected on pilot basis NMC nashik news)

राज्य शासनाने २०१९ पासून शहर विकास आराखडा तयार करताना जीआयएस (जिओग्राफीकल मॅपिंग सिस्टम) मॅपिंग करणे बंधनकारक केले आहे. नाशिक महापालिकेचा शहर विकास आराखडा २०१७ मध्ये करण्यात आला.

त्यामुळे शहर विकास आराखड्याचा नकाशा द्विस्तरीय पध्दतीचा आहे. शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे शहरातील रस्त्यांचे जमीन योजना (लॅण्ड प्लॅन ॲन्ड लॅण्ड शेड्यूल) प्रमाणीकृत करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी एका खासगी संस्थेला काम देण्यात आले. महापालिका हद्दीत जवळपास २७० चौरस किलोमीटर क्षेत्राचे जीपीएस मॅपिंग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. शहरातील मालमत्ता, रस्ते आदींची माहिती संकलित करून जीआयएस मॅपिंगवर टाकण्यात आली आहे.

आर्टिलरी सेंटर, पोलिस अकादमी, सीएनपी व आयएसपी, विभागीय आयुक्त कार्यालये, केंद्रीय कार्यालये. या सुरक्षेच्या स्थळांचेदेखील मॅपिंग पूर्ण झाले आहे. संकलित झालेली माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रायोगिक तत्त्वावर गावठाण

प्रायोगिक तत्त्वावर एक गावठाण निश्चित करून तेथील माहिती डिजिटायझेशन झालेल्या नकाशावर मॅपिंग केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३१ गावठाणे व संपूर्ण शहराची माहिती अपलोड केली जाणार आहे.

या सुविधा होतील उपलब्ध

- रस्ते, जमिनीचे ले-आउट, उद्याने, विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर, एमएनजीएलची पाइपलाइन, ड्रेनेज पाइप, विहीरी, टेलिफोनचे जाळे, रस्त्यांची लांबी व रुंदी, प्लॉटची लांबी व रुंदी, अतिक्रमण, इमारतींच्या फूट प्रिंट, ॲमेनिटी स्पेस आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

"जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून सर्व मिळकतीचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्यांत प्रायोगिक तत्त्वावर एक गावठाण निश्चित करून तेथील माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहराची माहिती अपलोड होईल."

- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : देशभरात थंडी वाढत असताना सोनं-चांदीच्या भावात मात्र गरमी! चांदी २.५ लाखांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

पुण्यात विद्यार्थिनीने चक्क शिक्षिकेलाच पाठवला 'I Love You' चा मेसेज; ब्लेडने हातावर कोरलं नाव, इमारतीवरून उडी मारण्याचीही दिली धमकी

हॅपी बर्थडे भाईजान! सलमान खानने गाठली साठी, पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी, एक्स गर्लफ्रेंडने केलं असं काही की...

बलात्कार प्रकरणात १० वर्ष शिक्षा! आता निर्दोष सुटकेसह सरकारी नोकरीही मिळाली, तेच जोडपं आता लग्नही करणार; सुप्रीम कोर्टात दुर्मिळ केस

BJP Sankalpnama Abhiyan : भाजपला हवा 'ग्राउंड लेव्हल फीडबॅक’, ‘संकल्पनामा अभियाना’मागची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT