radhakrushna-game.jpg 
नाशिक

#Lockdown : आयुक्त म्हणताएत...'ग्राहकांना आठवडाभराचा भाजीपाला द्या!'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लॉकडाउनमधून जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री वगळल्या असल्या तरी नागरिकांची गर्दी होत असल्याने त्यातही अनेक नागरिक एक दिवसाचा भाजीपाला खरेदी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजीपाला, फळे विक्री करताना हॅन्डग्लोज, मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या असून, विक्रेत्यांनी एका कुटुंबास आठवडाभर पुरेल अशा कापडी पिशव्यांचे पॅकिंग करून विक्री करण्याचे आवाहन केले आहे. 

नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची भीती

लॉकडाउनमध्ये भाजीपाला, मेडिकल, वैद्यकीय सुविधा वगळल्या आहेत. नागरिकांना भाजीपाला कमी पडू नये म्हणून महापालिकेने नियमित भाजी बाजाराव्यतिरिक्त अन्यत्र अतिरिक्त भाजी बाजारांची निर्मिती केली आहे. परंतु भाजी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याने महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे. विक्रेते व नागरिकांकडून भाजी विक्री व खरेदी करताना हॅन्डग्लोज घातले जात नाहीत, मास्क लावले जात नाही, तसेच निर्जंतुकीकरण करणाऱ्या सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने आयुक्त गमे यांनी भाजीपाला खरेदी, विक्री संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देणारी यादी संकेतस्थळावर

भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी दररोज बाहेर न पडता आठ दिवसांचा भाजीपाला खरेदी करावा, तसेच विक्रेत्यांनी सुटा भाजीपाला, फळे विक्री करण्याऐवजी एका कुटुंबास आठवडाभर पुरेल अशा प्रकारे कापडी पिशव्यांमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचे पॅकेजची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

संकेतस्थळावरून मिळवा भाजीपाला 

महापालिकेने भाजी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देणाऱ्या शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT