st-bus
st-bus 
नाशिक

दिव्यांगांची ‘एसटी’कडून अडवणूक! वैश्‍विक ओळखपत्र ग्राह्य धरले जात नसल्याची तक्रार 

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : दिव्यांग व्यक्तींना एसटीच्या तिकीट सवलतीसाठीचे दिलेले वैश्‍विक ओळखपत्र (यूडीआयडी) ग्राह्य धरले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहकांकडून दिव्यांगांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार साधना अपंग संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी केली असून, याबाबत वाहकांना समज देण्याच्या मागणीचे निवेदन कळवण आगारप्रमुखांना देण्यात आले. 

त्रास दिला जात असल्याची तक्रार

दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रांच्या जंजाळातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (यूडीआयडी) तिकिटातील सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात आलेले असतानाही राज्यातील काही आगारांच्या वाहकांकडून दिव्यांग व्यक्तींची अडवणूक होत आहे; परंतु एसटी महामंडळाचे वाहक दिव्यांग बांधवांना एसटी आगाराचे सही-शिक्का असलेल्या ओळखपत्राची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अपंग सुरक्षा कायदा २०१६ अन्वये वैश्‍विक कार्ड सोबत असल्यावर सवलत देणे बंधनकारक केले आहे; परंतु वाहक आणि काही अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार दिव्यांग बांधव करीत आहेत. 

याबाबत कळवण आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे, दशरथ महाले, दीपक भोये, दिगंबर पाटोळे, भरत मोरे, संतोष रोकडे आदी उपस्थित होते. यापुढे दिव्यांग बांधवांना अडचण आल्यास अपंग साधना संघातर्फे एसटी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT