holiday
holiday esakal
नाशिक

Nashik News : शासकीय कार्यालये, बाजार समित्या आज बंद; MIDCतील कंपन्या सुरु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवस तर राज्य सरकारने पूर्ण दिवस शासकीय सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.२२) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लिलाव बंद राहणार आहेत.

मात्र, एमपीएससी, एमयूएचएस यांच्या परीक्षा निर्धारित वेळेप्रमाणेच होणार आहेत. तसेच एमआयडीसीतील प्रमुख कंपन्या सुरु राहणार आहेत. (Government offices market committees closed today due to ayodhya ram mandir nashik news)

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहर पूर्णत: भगवेमय झाले आहे. चौकाचौकात भगव्या पताका, भगवे झेंडे फडकत असून, प्रभू श्रीरामाशी निगडित गाण्यांनी वातावरण भक्तीमय झाले आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. तर रस्ता दुभाजकांवर शुभेच्छा फलक लागले आहेत.

दोन ते पाच मीटर अंतरावर हे फलक झळकत असल्याने वाटसरूंना कुठला फलक वाचावा आणि कुठला नको, असे झाले आहे. काही ठिकाणी भव्य आकाश कंदील लावून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच शिवसेना (उबाठा) गटाचा नाशिकमध्ये मेळावा होत असल्याने त्यांनीही भगवे झेंडे लावले आहेत.

वाहतूक बेटे तर फलक व झेंड्यांनी अक्षरश: झाकोळले आहेत. शहरात वातावरण निर्मिती जोरदार झाली असली तरी शासकीय कामकाजावरही याचा परिणाम होणार असल्याचे दिसून येते. बहुतेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

''बाजार समितीत लिलाव बंद ठेवले आहेत. मात्र, व्यापारी संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, सायंकाळी लासलगाव बाजार समितीत मोठा कार्यक्रम होणार आहे.''- बाळासाहेब क्षिरसागर, सभापती (लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)

काय सुरु

-‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा

-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा

-खासगी कार्यालये, हॉस्पिटल

-एसटी बसेस

-एमआयडीसी

काय बंद

-शासकीय कार्यालये

-शाळा, महाविद्यालये

-बाजार समित्या

-बँका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT