GPS System Vehicle esakal
नाशिक

1 हजार वाहनांवर GPS प्रणाली; नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

कुणाल संत

नाशिक : जिल्ह्यातील अवैधरीत्या गौण खनिजाच्या वाहतुकीवर (Illegal transportation of Secondary minerals) आळा बसविण्याच्या उद्देशाने घालून दिलेल्या नियमानंतर जिल्ह्यातील एक हजार ३१३ वाहनांवर गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांकडून ‘महाखानिज’ (Mahakhanij) या अधिकृत संकेतस्थळावर (Website) नोंद करत जीपीएस प्रणाली (GPS System) वाहनांवर बसविली आहे, तसेच ज्या वाहनांनी अद्यापपर्यंत जीपीएस प्रणाली बसविली नाही अशा वाहनधारकांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. (GPS system on 1000 vehicles Deadline for registration is 31st July Nashik News)

जिल्ह्यातील अवैध उत्खननाच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर खाणपट्टाधारक, क्रशरचालकांनी जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीशी इंटिग्रेट करण्याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी परिपत्रक काढत बंधनकारक केले होते. तशा सूचनादेखील सर्व तहसीलदारांना दिल्या होत्या. मात्र जीपीएस प्रणाली बसवून संगणकीय प्रणालीशी इंटिग्रेट केले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले होते. त्यानंतर सर्व खाणपट्टा, क्रशरचालकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ३१३ वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविल्याची माहिती जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात एकूण तीन हजार ५४४ वाहनांच्या मदतीने गौण खनिज वाहतूक केली होती.

यानुसार दोन हजार २३१ वाहने अद्यापही नोंदणीपात्र असून, त्यांची प्रक्रियादेखील सुरू आहे. दरम्यान, या सर्व वाहनांवर यंत्रणा बसविण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविली आहे. या मुदतीनंतर महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून अथवा जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील, अशा व्यक्तीकडून निरीक्षणाच्या वेळी, शिवाय गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

"जिल्ह्यातील एक हजार ३१३ वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे, तर दोन हजार २३१ वाहनांची नोंद होणे बाकी आहे. सद्यःस्थितीत जीपीएस यंत्रणा बसविली त्यांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत जर या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविली व वाहनातून गौण खनिजाची वाहतूक होत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे." - रोहिणी चव्हाण, जिल्हा गौण खनिज अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT