Grape exporters and packhouse suspensions were revoked
Grape exporters and packhouse suspensions were revoked 
नाशिक

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ‘ट्रेड वॉर'ला मोठी चपराक; द्राक्ष निर्यातदार अन् पॅकहाऊसचे निलंबन रद्द 

महेंद्र महाजन

नाशिक : रशियात ४१ कंटेनरमधील द्राक्षांमध्ये कीड सापडल्याने निर्यातदार कंपन्या आणि १४ पॅकहाऊसचे निलंबन करण्यात आले होते. त्यामागे ‘ट्रेड वॉर'चा संशय व्यक्त करण्यात आला होता. आज अखेर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या संशयाला चपराक दिली. द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाऊसचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, संचालक मधुकर क्षीरसागर यांनी नवी दिल्लीत खासदार डॉ. भारती पवार यांच्या समवेत केंद्रीय कृषी मंत्रालय गाठले. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे निलंबन रद्द झाल्याचे क्षीरसागर यांनी भ्रमणदूरध्वनीवरुन सांगितले. दरम्यान, २०१९-२० मध्ये रशियामध्ये दीड हजार कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यापैकी ४१ कंटेनरमध्ये कीड सापडली. रशियाच्या क्वारंटाइन विभागाने भारतीय प्लान्ट क्वारंटाइन विभागाला कळवले. त्यानंतर १४ निर्यातदारांचे आणि पॅकहाऊस परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात आढळत नसलेली कीड कंटेनरमध्ये आढळली कशी? असा प्रश्‍न निर्यातदारांना पडला होता. यासंबंधाने झालेल्या चौकशीत प्रश्‍नावलीला निर्यातदारांनी उत्तर दिले होते. 

 काळजी घेण्याची सूचना

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. पी. एस. नैन यांनी निलंबन रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्याची प्रत क्षीरसागर, मुंबईचे अधिकारी, ‘अपेडा‘चे अध्यक्ष यांना देण्यात आली आहे. रशियासाठी ‘टेबल ग्रेप्स' निर्यात करताना भविष्यात अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना मंत्रालयाने निर्यातदार आणि पॅकहाऊस चालकांना देण्यात आली आहे. तसेच कंटेनर समाधानकारक परिस्थितीत आयात होणाऱ्या देशापर्यंत पोचतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. फायटो सॅनिटरी प्रक्रियेकडे ध्यान देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 


पॅकहाऊसचा प्रश्‍न निकाली 

पॅकहाऊसचा उपयोग हंगामानंतर द्राक्षांखेरीज इतर फलोत्पादन क्षेत्रासाठी करण्याचा प्रश्‍न केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयानंतर मार्गी लागला आहे. पण रशियातून द्राक्ष निर्यातीमध्ये अडचण येण्याची ही पहिली वेळ नाही. रशियामध्ये द्राक्षांची निर्यात वाढत आहे. गेल्यावर्षी द्राक्षांचे कंटेनर रशियामध्ये अडकवण्यात आले होते. यावेळी ४१ कंटेनर परत पाठवण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT