Guardian Minister Bhuse statement at nashik police parade ground Republic Day 2024 celebrations
Guardian Minister Bhuse statement at nashik police parade ground Republic Day 2024 celebrations esakal
नाशिक

Republic Day 2024 : नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या विकासात सहभाग नोंदवावा : पालकमंत्री भुसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Guardian Minister Bhuse statement at nashik police parade ground Republic Day 2024 celebrations nashik news)

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर काल (ता.२६) संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्षाची सुरूवात नुकतीच उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. हे प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरे करतांना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देण्यात येत आहे.

त्यांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. यासोबतच बळीराजासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामात केवळ एक रुपयात पिक विमा जाहिर केला.

या योजनेत जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रतिकुल परिस्थितीत अधिसूचना काढून आतापर्यंत एक लाख ३७ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६४.८८ कोटी रुपये जमा केले आहेत.

शासनाने ई- हक्क प्रणालीच्या माध्यमातून ११ प्रकारच्या नोंदी ७/१२ वर घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य असून या प्रणालीचा नागरिकांना लाभ होत आहे.

त्याचप्रमाणे भूमी अभिलेखांचे संगणकीकरण कार्यक्रमा अंतर्गत ७/१२, फेरफार व जन्म मृत्यू नोंदी इ. अभिलेख नागरिकांना ऑनलाईन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असून नाशिक महसूल विभाग हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, यासाठी सर्वांचे अभिनंदन करून यात असेच सातत्य ठेवावे, अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT