नाशिक

गुळवंचला लोकसहभागातून जलताराला गती ५०० खड्ड्यांचे लक्ष्य, भूमिपुत्रांकडून मदत

CD
गुळवंच येथे जलतारासाठी भूमिपुत्रांकडून मदत जाहीर ------------- पाचशे खड्डे करण्याचे लक्ष्य ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१३ ः पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमचा उपाय म्हणून जलतारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढविण्यात येत आहे. ५०० खड्ड्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यासाठी जेसीबी उपलब्ध करून देण्यास गुळवंचचे भूमिपुत्र नानासाहेब सानप यांनी मदत जाहीर केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांना ग्रामपंचायतीतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांबाबतची माहिती देऊन लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले. त्यानुसार ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी, माजी सरपंच भाऊदास शिरसाठ, किशोर काकड, कणकोरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सांगळे आदींनी पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या प्रकल्पाबाबत गावात व्यापक जनजागृती झाली असून, लोकसहभागातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. प्रकल्पातून झालेली जलक्रांती आणि त्याचे व्हिडिओ सानप यांना दाखवण्यात आले. सानप यांनी जेसीबी मदत जाहीर केली. ५०० खड्ड्यांसाठी पाच लाख रुपये खर्च येणार असून त्या मदतीमुळे जलतारा प्रकल्पाला गती मिळणार आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT