Gurumauli Annasaheb More giving guidance during the weekly question and answer and satsang function on Sunday at the main center in Dindori. esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More: अध्यात्मातून राष्ट्रविकास साधा : गुरुमाऊली

दिंडोरी येथील प्रधानकेंद्रात सेवकऱ्यांशी हितगूज, ग्रामअभियानात रोज एक सेवेकरी घडवा

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : ‘अध्यात्मातून राष्ट्रविकास’ हे सेवामार्गाचे ब्रीद आहे. तर ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ हा सेवामार्गाचा नारा आहे.

हीच भूमिका स्वीकारून सेवेकऱ्यांनी कुटुंब,गाव, देश अन् संस्कृती संपन्न करण्यासाठी ग्राम अभियानातून सेवाकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statement National development through spirituality nashik)

दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता.९) साप्ताहिक प्रश्नात्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोहप्रसंगी मार्गदर्शन करताना गुरूमाऊली बोलत होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी गुरुमाऊलींनी संवाद साधला.

गुरुमाऊली मोरे म्हणाले, की सेवामार्गाने मानवहित, राष्ट्रहित आणि विश्वशांतीलाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या जवानांना बळ मिळून त्यांचे संरक्षण व्हावे, शेतकरी सुखी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळाव्यात आणि अंधश्रद्धा दूर होऊन सर्वसामान्यांनी विज्ञानाची कास धरावी याकरिता सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून अब्जचंडीची सेवा केली जात आहे. दुर्गासप्तशतीचे ९ पाठ केल्यास नवचंडी, १०० पाठ केल्यास शतचंडी, १ हजार पाठ केल्यास सहस्त्रचंडी, दहा हजार पाठ केल्यास आयुतचंडी, एक लाख पाठ केल्यास लक्षचंडी आणि एक कोटी पाठ केल्यास कोटीचंडी होते.

ही संपूर्ण सेवा राष्ट्र हितासाठीच सेवामार्गातर्फे करण्यात आली होती. त्याच उद्देशाने श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र आणि रुद्रसूक्त यांचे प्रत्येकी १०० कोटी पाठ करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

आजपावेतो प्रत्येकी ८५ कोटी पाठ झालेले आहेत अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली. देशाचे भले होण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी ही अब्जचंडीची सेवा अवश्य केली पाहिजे.

आषाढ नवरात्रात ही सेवा मोठ्या प्रमाणावर करावी, ग्राम अभियानात सहभागी होऊन रोज एक सेवेकरी घडवून दुसऱ्याचे दु:ख, अश्रू पुसण्यासाठी सेवाकार्य करा असा उपदेश त्यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्व विभागांनी झोकून सेवाकार्य करावे

आदर्श पिढी घडविण्यासाठी मूल्यसंस्कार विभागाने, दु:खी व्यक्तीला सुखी करण्यासाठी प्रश्नोत्तरे विभागाने, सर्वांचे आरोग्य निरामय राहण्यासाठी आयुर्वेद विभागाने, विवाह समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी विवाह मंडळांनी, वास्तूचे वास्तूपण टिकविण्यासाठी वास्तूशास्त्र विभागाने,

कायदेविषयक सहकार्य व सल्ला देण्यासाठी कायदेविषयक सल्लागार विभागाने, शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी आणि सर्वांना विषमुक्त अन्न मिळण्यासाठी कृषी विभागाने तसेच कुलधर्म-कुलाचाराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती विभागाने झोकून देऊन सेवाकार्य करावे अशी आज्ञा गुरुमाऊलींनी केली.

श्रावणात भागवत सप्ताह

पूर्वजन्मदोष, भोग, प्रारब्ध, क्रियमाण, शाप, ताप, तळतळाट, दोष, पीडा, बाधा, यावर भागवत सेवा प्रभावी असून आगामी श्रावण महिन्यात भागवत सप्ताह घेण्याचे नियोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT