shahin cyclone esakal
नाशिक

शाहीन वादळाचा शेवट उत्तर महाराष्ट्रात; मुसळधार पाऊस शक्य

महेंद्र महाजन

नाशिक : शाहीन वादळाचा (shahin cyclone) शेवट उत्तर महाराष्ट्रामध्ये शनिवारी (ता. ९) आणि रविवारी (ता. १०) मुसळधार पावसाने होईल, असा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तवला आहे. तसेच १६ ते १८ ऑक्टोंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाचे महाराष्ट्रात, तर १३ ते १४ ऑक्टोंबरला राजस्थानमध्ये आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात १९ आणि २० ऑक्टोंबरला परतीचा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे.

यंदाच्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात ८६, धुळ्यात ११८.८, नंदूरबारमध्ये ६८.२, जळगावमध्ये १२३.९ टक्के पावसाची नोंद महारेनच्या संकेतस्थळावर झाली आहे. गेल्यावर्षी या कालखंडात उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये ९०.७, धुळ्यात १३१.४, नंदूरबारमध्ये ७३.३, जळगावमध्ये १३५.३ टक्के इतकी झाली होती. नाशिकमध्ये आज कमाल ३२.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे उकाड्याची धग वाढली आहे. त्यामुळे ऑक्टोंबर ‘हीट’ वाढल्याची भावना नाशिककरांमध्ये तयार झाली आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही आगामी मुसळधार पावसाची चाहूल आहे.

२५ ऑक्टोंबरनंतर वातावरण निवळेल

परतीचा वळीव पाऊस पश्‍चिम महाराष्ट्रात होईल. मात्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वळीव पावसामुळे ‘वॉटर लॉगींग’ होण्याची शक्यता हवामानशास्त्र अभ्यासकांना वाटते आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार परतीच्या पावसाचे वातावरण २५ ऑक्टोंबरनंतर निवळण्यास सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण १०० टक्के भरेलेलेच; शेतकऱ्यांना १५ जानेवारीनंतर रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन, वाचा...

आजचे राशिभविष्य - 29 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: गव्हाच्या पीठात कांदा टाकून बनवा 'हा' खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

Satara Crime:'शिरवळला मारहाणीतून एकाचा खून';दोघेजण पाेलिसांच्या ताब्‍यात, एकुलता एक मुलाबाबत घडला धक्कादायक प्रकार?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT