Hemant Parekh kidnaped 
नाशिक

Hemant Parakh kidnaped: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे राहत्या घरासमोरुन अपहरण

कार्तिक पुजारी

नाशिक- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरुन त्यांचे अपहरण झाले. माहितीनुसार शनिवारी रात्री ९:४० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी आणि दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे.

अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहेत. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

एका प्रसिद्ध व्यायसायिकाला त्याच्या घरासमोरुन उचलण्यात आल्याने इंदिरानगरसह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, तसेच कोणी अपहरण केले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस याप्रकरणात तपास करत आहेत. अपहरणकर्त्यांना लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT