High Court approved the dismissal order of the Board of Directors of the District Bank Nashik Marathi News 
नाशिक

जिल्हा बँक बरखास्तीवर न्यायालयाचीही मोहोर; विद्यमान संचालकांना निवडणूकीचा मार्गदेखील बंद

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशाला शुक्रवारी (ता. १९) मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली. या संदर्भात बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त झाले असून, विद्यमान संचालकांना आगामी निवडणूक लढविण्याचा मार्गदेखील बंद होणार आहे. दरम्यान, या निकालासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिकाकर्ते आहेर यांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार बॅंकेत अनियमितता आणि नियमबाह्य कामकाजामुळे ‘नाबार्ड’ने विद्यमान संचालक मंडळ सहकार नियम ११० अ अन्वये बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रशासकांनी बॅंकेचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी कामकाजदेखील सुरू केले होते. मात्र त्यानंतर राजकीय घडामोडींत राज्य शासनाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने भाजपचे केदा आहेर बॅंकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देऊन संचालक मंडळाला कामकाज करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली होती. या याचिकेवर प्रारंभी सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य शासनाला भूमिका मांडण्याची सूचना केली होती. मात्र राज्य शासनाच्या वकिलांनी याबाबत विरोध केला नाही. त्यामुळे न्यायालयाने प्रशासक नियुक्तीस स्थगिती दिली. 

न्यायालयाने स्थगिती दिल्यावर गेली तीन वर्षे या संदर्भात तारीख पे तारीख अशी स्थिती होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी बॅंकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी या याचिकेचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर दोन महिन्यांपासून त्यांची सुनावणी सुरू होती. शुक्रवारी त्याचा अंतिम आदेश न्यायमूर्ती बिस्ट आणि धानुका या खंडपीठाने निकाल दिला. त्यात अध्यक्ष केदा आहेर यांची याचिका फेटाळण्यात आली. येत्या आठ दिवसांत अध्यक्षांनी आपला कार्यभार प्रशासकांना द्यावा, असे आदेशात म्हटले. अद्वय हिरे यांच्यातर्फे अॅड. विश्वजित मोहिते यांनी काम पाहिले. 

नेत्यांना बॅंकेची दारे बंद? 

शिरीषकुमार कोतवाल, आमदार माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दिलीप बनकर, सीमा हिरे, सुहास कांदे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, गणपतराव पाटील, शिवाजी चुंभळे, परवेझ कोकणी, संदीप गुळवे, नामदेव हलकंदर, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते व लोकप्रतिनिधी बॅंकेचे संचालक आहेत. त्यांना सहकारातील तरतुदींनुसार आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नेत्यांना आता बॅंकेची दारे बंद झाली आहेत. त्यांना आपल्या कुटुंबातील मंडळींना राजकारणात उतरवावे लागेल. त्यामुळे यातील किती नेते आपले समर्थ व कार्यकर्त्यांनी संधी देण्याचा मोठेपणा दाखवतात याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT