नाशिक

राज्यात विजेच्या महानिर्मितीची उच्चांक मागणी

सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज (ता.२३) शिखर मागणीच्या कालावधीत (पीक हावर) मध्ये राज्याची विजेची मागणी २७ हजारांवर गेली असताना महानिर्मितीने कोळशाचे दुर्भिक्ष्य अजून ही संपलेले नसतांना तेवढ्याच सक्षमपणे वीज निर्मिती सुरू होती.

कोळसा अभावी परळीचा एक, भुसावळचा संच क्रमांक तीन, कमी कामगार व अभियंता संख्या असल्याने नाशिकचा एक संच, तांत्रिक कारणास्तव खापरखेडाचा संच क्रमांक पाच असे तीन संच बंद वगळता औष्णिकची व जलविद्युतसह सोलरची वीज निर्मिती सुरू आहे.

गत काही महिन्यांपासून देश भरतील वीज केंद्र कोळसा तुटवड्याला सामोरे जात आहेत. महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रांना किमान आठवड्याभराचा तरी स्टॉक शिल्लक राहवायस हवे असताना मात्र सध्या रोजच्या रोज किंवा सर्व वीज केंद्रात २/३ दिवसाचा असून वीज निर्मिती सातत्य टिकवून औष्णिकची निर्मिती सहा हजार २५० मेगावॉट निर्मिती सुरू होती. औष्णिक सोबत सध्या जलविद्युत वर मदार आहे. कोयना जल विद्युत संच १/२ मधून ५१० मेगा वॅट, संच ३ मधून ३१५, संच चार मधून ८००, के डी पी एच मधून ३६, वैतरणा ५९ मेगा वॅट अशी १७८० मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती.

मुंबई शहराची मागणी ३१०० मेगावॉट तर उर्वरित महाराष्ट्राची मागणी २४ हजार ४६० मेगा वॅट एवढी होती. एकूण मागणी २७ हजार ५६२ मेगा वॅट एवढी असताना राज्याच्या महानिर्मिती सह सर्व स्रोतांतून १८ हजार ६९५ मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती. सेंट्रल सेक्टरमधून ८७८१ हिस्सा होता. पण विजेच्या मागणी अशीच चढत्या श्रेणीत राहिली व कोळसा पुरवठा नियमित होऊ शकला नाही तर मात्र महानिर्मितीला आणखी जास्त प्रमाणात कसरत करावी लागेल.

संख्याबळाचा अभाव

परळी येथील संच सहा काल रात्री काही तांत्रिक कारणास्तव बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर काम करून सकाळी त्यातून वीजनिर्मिती सुरू झाली होती. नाशिकचे संख्याबळ आणखी वाढले तर तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकतात.

''कोळसा तुटवड्याला सामोरे जात असताना सर्व ठिकाणी कोळशाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू असल्याने महानिर्मिती चे जास्तीत जास्त संच सुरू आहेत.''

-महेश आफळे , मुख्य जनसंपर्क अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT