homeless took shelter of Ganeshwadi vegetable market latest marathi news esakal
नाशिक

Monsoon News : बेघरांनी घेतला गणेशवाडी भाजी मंडईचा आसरा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदेची पाणीपातळी सहा दिवसांनंतरही कमी झालेली नाही. त्यातच गंगापूर धरणाच्या (Gangapur dam) पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांकडून अद्यापही पाण्याचा मोठा विसर्ग होण्याची शक्यता गृहित धरून गंगाघाटावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या अनेक बेघर कुटुंबांनी गणेशवाडीतील भाजी मंडईत आश्रय घेतला आहे. (homeless took shelter of Ganeshwadi vegetable market nashik Latest marathi news)

सध्या या मंडईच्या अर्ध्या भागात भाजीविक्रेते बसतात, तर निम्या जागेत हे बेघर आश्रयाला आले आहेत. यात वृद्ध, महिला, लहान मुले यांची संख्या मोठी आहे. यातील अनेकजण परिसरातच प्रार्तविधीला जात असल्याने मंडईत दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील काही स्वयंसेवी संस्था, दानशूर नागरिक यांच्याकडून सकाळी व सायंकाळी या लोकांना अन्नदान करण्यात येते. याशिवाय गाडगे महाराज धर्मशाळेचे अन्नछत्र, रामकुंडावरील साई सेवाधाम यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते.

त्यामुळे या वर्गाच्या अन्नाचा प्रश्‍न मिटलेला असला तरी भाजी मंडईतील कचरा, घुशींनी काढलेली मोठी बिळे यामुळे येथे वास्तव्यास असलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT