coronavirus esakal
नाशिक

कोरोनावर उपचारासाठी आता होमिओपॅथी व आयुर्वेदिकही

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा (corona third wave) धोका लक्षात घेता ॲलोपॅथीबरोबरच आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार होमिओपॅथी (homeopathy) व आयुर्वेदिक (aayurveda) औषधांचा साथ रोग उपचारात समावेश करावा अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी (mayor satish kulkarni) यांनी यासंदर्भात शासनासोबत पत्रव्यवहार केल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

कोरोनावर उपचारासाठी आता होमिओपॅथी व आयुर्वेदिकही

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसताना ॲलोपॅथीबरोबरचं होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे दिल्यास रुग्ण निश्‍चितच बरा होईल, त्यामुळे महापालिकेला उपाययोजनेंतर्गत होमिओपॅथी औषध वाटप करण्याची परवानगी मिळावी अशा आशयाचे पत्र महापौर सतीश कुलकर्णी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यानुसार आरोग्य सचिवांनी महापालिकेला पत्र लिहून सूचना दिल्या आहे. त्यात महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन होमिओपॅथी औषधांचे वाटप करावे, कोविडचा सामना करण्यासाठी आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना तयार करून उपचार करावे, साथीच्या आजाराची तीव्रता सौम्य तसेच मध्यम प्रभाव असलेल्या रुग्णांवर देखील प्रभावी ठरत असल्याने त्या अनुषंगाने औषधांचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचा वापर साथ रोगात करणे गरजेचे आहे. यामुळे बचाव करण्यापासून संरक्षण होण्यास मदत होईल. लवकरच कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल होईल. - सतीश कुलकर्णी, महापौर,नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT