Cold Cough Patient Increase
Cold Cough Patient Increase sakal
नाशिक

Nashik News : बदलत्या वातावरणामुळे दवाखाने ‘हाउसफुल्ल’; मालेगावमधील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरासह ‘कसमादे’ परिसरात वातावरणात मोठा बदल झाला आहे. पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारी घाम काढणाऱ्या उन्हाचा तडाखा असतो. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होते. थंडी, ऊन व दमट वातावरण असा खेळ सध्या सुरु आहे.

त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.(Hospitals housefull due to changing environment in malegaon nashik news)

त्यातच, शहरात सर्वत्र डासांचा उद्रेक आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहर व परिसरातील दवाखाने ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. येथील सामान्य रुग्णालय आणि महापालिकेचे कॅम्प, अलहाज हारून अन्सारी आदी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण सर्वाधिक उपचार घेत आहेत. महिन्यापासून इथे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सामान्य रुग्णालयात बुधवार (ता.२७) पासून रुग्णांची कोरोनाची ‘रॅपीड अँटीजन टेस्ट’ केली जात आहे. मुस्लीमबहुल पूर्व भागातील मोहल्ला दवाखान्यात सर्दी व खोकला यासह विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

त्यात लहान मुलांची संख्या मोठी आहे. सध्या ‘व्हायरल फिव्हर’ मोठ्या प्रमाणावर आहे. तज्ज्ञांकडून नागरिकांना सध्याच्या वातावरणात विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. घर व परिसराची स्वच्छता ठेवावी. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे. सकस व संतुलित आहाराचे सेवन करावे. ताप आल्यास जवळच्या रुग्णालयात उपचार करावा.

शिंक आल्यास तोंडावर रुमाल वापरावा. गरम पाण्याची वाफ घ्यावी. पहाटे व सकाळी बाहेर पडताना उबदार कपडे वापरावे. फ्रीजमधील पदार्थ, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स शक्यतो टाळावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नागरिकांनी आवश्‍यक ती काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

''ताप व इतर लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. टीबी, अस्थमा, मधुमेह यासह विविध आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे घालून घराबाहेर पडावे. घर व परिसराची स्वच्छता ठेवावी.''- डॉ. अनिस मोमीन, अतिरिक्त शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय

''‘व्हायरल फ्लू’ मध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. दिवसभर पाणी प्यावे. कोमट पाण्याच्या वापर करावा. लहान मुलांना तळलेले व बाहेरचे पदार्थ देणे टाळावे.''- डॉ. संदीप ठाकरे, बालरोगतज्ज्ञ, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT