Methi Laddu
Methi Laddu esakal
नाशिक

Nashik News : मेथीचे लाडू बनवताना गृहिणींचे बजेट कोलमडणार! ड्रायफ्रूटचे दर दीडपट ते दुप्पट वाढले

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : हिवाळा आला की महिला वर्गाला कुटुंबीयांच्या शरीर संवर्धनासाठी पोषक ठरणाऱ्या मेथीचे लाडू बनवण्याचे वेध लागतात.

गत वर्षाच्या तुलनेत यंदा काजू, बदाम, पिस्ता या ड्रायफ्रूटचे दर तेच असले तरी गोडंबी, अंजीर, खारीक व खोबरे या प्रमुख घटकांचे दर दीडपट ते दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे मेथीचे लाडू बनवताना गृहिणींचे बजेट वाढणार आहे. (Housewives budget collapse while making methi laddu Prices of dry fruits increased by one half to two times Nashik News)

पौष्टिक लाडू म्हणून मेथीचे लाडू घरोघरी बनवले जातात. त्यात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, गोडंबी, खारीक, खोबरे, गूळ, खसखस, मेथी या घटकांचा समावेश असतो. काही जण तेलात तर काही गावरानी तुपात बनवतात. घरातील प्रत्येक सदस्याला दररोज एक याप्रमाणे लाडू बनवण्याकडे महिलांचा ओघ असतो.

यंदा किमान एक ते दीड हजार रुपयांची वाढ प्रत्येक कुटुंबाच्या लाडूच्या बजेटमध्ये होण्याचा अंदाज आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे वाढलेले दर चढते राहण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तवली जाते आहे. त्यामुळे यंदा मेथीचे लाडू ग्राहकांचा खिसा रिकामा करतील.'

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

भाव वाढण्याचाही तर्क

लाडूंमधील प्रमुख घटक काजूचे दर ६०० ते ८००, बदामाचे हजार ते बाराशे, पिस्त्याचे दर बाराशे ते पंधराशेच्या घरात प्रतिकिलो होते. गूळ प्रतिकिलो ६० ते ७० रुपये होता. या सर्वांच्या किमतीत कुठलीही वाढ न झाल्याने तेच आहेत.

गेल्यावर्षी ६०० ते ८०० रुपये किलो असणारी गोडंबी आता दुपटीने वाढ होऊन १२०० ते १४०० पोचली आहे. अंजीर ६०० ते ७०० वरून एक हजार किलो तर खसखसच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली असून ते २५०० ते ३००० रुपये किलोवर पोचले आहेत.

लाडू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खोबऱ्याचे दर २०० रुपयांवरून ३०० ते ५०० पर्यंत गेले आहेत. जसजशी थंडी वाढेल तसतसे भाव वाढण्याचाही तर्क लावला जातो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT