Raj Thackeray
Raj Thackeray esakal
नाशिक

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अचानक कसा निर्माण झाला? राज ठाकरेंचा सवाल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थिगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे. अचानक निर्माण झालेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा सरळ सोपा नाही त्यामागे राजकारण आहे, अशा शब्दांत त्यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, "अचानक हा ओबीसींचा मुद्दा आला कसा? हा प्रश्न मला पडलाय. केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना कशी काय करायला सांगितली? कोर्टामध्ये याविरोधात कसा निर्णय आला? हे दिसतं तसं सरळ प्रकरण नाही. मी अनेकदा हा विषय बोललो आहे की, जोपर्यंत आपण जातीपातीतून बाहेर येणार नाही. तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय त्याच्यासाठी हे सर्व चाललेलं राजकारण आहे. यामुळं मुख्य विषय सगळे बाजूला पडत आहेत."

...आणि अनिल देशमुख तुरुंगात

यामध्ये कुठल्याही गोष्टींची उत्तरं तुम्हाला सापडतचं नाही. कारण मुकेश अंबानींच्या घराबाहेर गाडी कोणी आणि कशासाठी ठेवली होती? हे मला अजूनही कळलेलं नाही. ते राहिलं बाजूला आणि गृहमंत्री अनिल देशमुख गेले तुरुंगात आहेत.

व्यावसायिक भारत सोडताहेत हे चांगलं लक्षण नाही - राज ठाकरे

व्यावसायिक लोक भारत सोडून जाताहेत ही चांगली लक्षण नाहीत. हे नोटाबंदीनंतर सगळं सुरु झालं त्यामध्ये कोविडचा बसलेला दोन वर्षाचा फटका कारणीभूत आहे. व्यवसायिक पाच वर्षात सोडून गेले ही देशासाठी चांगली गोष्ट नाही. कारण त्यांनी गुंतवणूक रोखली तर नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. म्हणजेच आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि आर्यन खान, सुशांत सिंह आणि अशा इतर गोष्टींत आपण वेळ घालवतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT