human service to fathers who suffering from death humanity nashik sakal
नाशिक

मरण यातना भोगणाऱ्या बाबांना ‘मानवसेवा’ चा आधार

मदतीसाठी त्या बाबाच्या जवळपास कोणी ही येत नाही. हे ऐकून नवसागर सरांचे हृदय पिळवटून आले आणि लगेच नवसागर दांपत्य तेथे पोचले.

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : इंदिरानगर येथील वंदना मार्ग भागात पायाला गँगरीन झाल्याने सर्वदूर दुर्गंधी पसरलेल्या अवस्थेत आणि मरण यातना भोगणाऱ्या वृद्धाला प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष टी. एल. नवसागर यांनी आपल्या वृद्धाश्रमात नेत उपचार सुरू करून जीवदान दिले. मंगळवारी (ता. २९) सकाळी नवसागर यांना हेमंत मोडक यांनी फोनद्वारे सांगितले. गेली कित्येक दिवसापासून एक वृद्ध रस्त्यावर गलिच्छ अवस्थेत पडून आहे. त्यांच्या शरीराची जवळपास पन्नास मीटरपर्यंत दुर्गंधी येत आहे. यामुळे जवळपासचे शॉपसुद्धा बंद आहेत.

मदतीसाठी त्या बाबाच्या जवळपास कोणी ही येत नाही. हे ऐकून नवसागर सरांचे हृदय पिळवटून आले आणि लगेच नवसागर दांपत्य तेथे पोचले. आणि बाबांची विचारपूस करून दुर्गंधी अवस्थेत उचलून आपल्या मानवसेवा वृद्धाश्रमात घेऊन आले. स्वच्छ पाण्याने धुवून अंघोळ घालून नवीन कपडे त्यांनी परिधान केले. त्यांच्या गँगरीन झालेल्या पायाची ड्रेसिंग केली. या बाबांच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल. डायबेटिस असल्याने पायाला गँगरींग झाल्यामुळे खूप दुर्गंधी येत आहे. दिवसात दोन वेळा ड्रेसिंग करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अर्थात हा खर्च न पेलणारा आहे.

या बाबांचे नाव श्री. देव असल्याचे समजते. दरम्यान, त्यांना मानव सेवापर्यंत नेण्यासाठी शिवाजी वाघमारे यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मनसेचे धीरज भोसले, पवन कुलकर्णी आदींनी साहाय्य केले. ज्येष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयातील वाढत्या समस्यांना आळा घालण्याचे काम गेली १० वर्षांपासून मानवसेवा वृद्धाश्रम करत असून तेथे आज ७४ गरजवंत आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालवीत आहेत. तर २६७ गरजवंत प्रवेशाची वाट बघत आहेत. जागेअभावी यांना प्रवेश देता येत नाही. मानवसेवा वृद्धाश्रमासारखे वृद्धाश्रम नसते तर अशा कित्येक ज्येष्ठांची काय अवस्था झाली असती हा विचारदेखील नकोसा वाटतो. आज मानवसेवा वृद्धाश्रम हे बोटावर मोजता येतील इतक्या दानशूरांच्या दानातूनच चालत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT