नाशिक

आपत्ती व्यवस्थापन, वन्यप्राणी रेस्क्यूचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक

CD
मानव- वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन, वन्यप्राणी रेस्क्यूचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासोबतच वन्यप्राण्यांचा सुरक्षित बचाव करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नाशिक पश्चिम वन विभागात वनकर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन व मानव- वन्यजीव संघर्ष परिस्थिती हाताळण्यांसंदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. रामेती प्रशिक्षण संस्था येथे झालेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रसंगी जलद प्रतिसाद पथकाची कार्यवाही आणि वन्यप्राणी रेस्क्यू ऑपरेशन या विषयांवर तीन सत्रे घेण्यात आली. श्रीकृष्ण देशपांडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. अभिजित महाले यांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रसंगी जलद प्रतिसाद पथकाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. वन्यजीव पशुवैद्यक डॉ. हेमराज सुखवाल यांनी वन्यप्राणी रेस्क्यू ऑपरेशनसंदर्भात मार्गदर्शन करून प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रात्यक्षिक घेतले. नाशिक पश्चिम वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षकांना रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान वापरण्यात येणारे साहित्य, त्याची हाताळणी तसेच प्रत्यक्ष परिस्थितीत घ्यावयाची दक्षता याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ (इगतपुरी), सुमित निर्मळ (नाशिक), विक्रम पदमोर (हरसूल) आणि पुष्पा सातारकर (फिरते पथक) यांच्यासह वन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशांत खैरनार यांनी केले. सुमित निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना वाघेरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT