wari-pandharpur.jpg 
नाशिक

शंभर वर्षांची प्रथा खंडित...अखेर कोरोनाने विठुभक्तांची वाट रोखलीच!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) आषाढीतील पंढरीची वारी म्हणजे आध्यात्मिक वाटेवरील सुखमय प्रवास... आषाढीवारीचे व्रत निफाड तालुक्‍यातील गावागावांतील अनेक वारकरी संप्रदायाने शंभर वर्षांहून अधिक काळापासून जपले आहे. यंदा कोरोनामुळे निफाड तालुक्‍यातील सुमारे 25 दिंड्यांचा टाळ-मुदंगाच्या गजरातील भक्तिमय प्रवास थांबला आहे. (वै.) तुकारामबाबा खेडलेकर यांच्यासह नामांकित दिंड्यांचे पिढ्यान्‌पिढ्या वारकरी संप्रदायाने जपलेले हे व्रत खंडित होणार आहे. 

विठुरायाच्या दर्शनाची आस यावर्षी लांबणार

कोरोनामुळे दिंड्या रद्द केल्याने विठुरायाच्या दर्शनाची आस या वर्षी लांबणार आहे. टाळ-मृदंगाचा अखंड निनाद आणि जातिभेदाच्या भिंतीशिवाय निघणाऱ्या दिंड्यांची पावले या वर्षी थांबली आहेत. शिस्तबद्ध दिंड्या पाहण्याचाही योग दुरावणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीसाठी नावनोंदणी मेपासूनच होते. खासकरून ग्रामीण भागातील वारकऱ्यांना दिंडीची ओढ लागून असते. मात्र, मेमध्ये लॉकडाउनमुळे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. त्यामुळे नावनोंदणी थांबली. 1 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्याआधी किमान दोन दिवस पंढरी गाठण्याची तयारी सुरू होते. मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती व रोज किती अंतर चालायचे, याचेही नियोजन होते. या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्‍वभूमीवर दिंड्यांच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. 

आठ हजार वारकऱ्यांचा दिंडी चुकल्याने हिरमोड 

निफाड तालुक्‍यातील खेडलझुंगे, खडकमाळेगावसह विविध गावांतून 25 दिंड्या पंढरीच्या दिशेने रवाना होतात. या वर्षी कोरोनामुळे दिंडी आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणखी किती दिवस राहणार, हे अनिश्‍चित आहे. अनलॉकच्या पुढील टप्प्यात मंदिरे खुली झाली, तर विठोबा माउलीचे दर्शन होणार आहे. निफाड तालुक्‍यातून दर वर्षी दिंड्यांमध्ये सुमारे आठ हजार वारकरी पायी प्रवासाला निघतात ते आपल्या लाडक्‍या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने. या वर्षी लॉकडाउनमुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला असून, माउलीचे दर्शन न मिळण्याची हुरहूर त्यांच्या मनात आहे. 

अन्नदानाची परंपराही खंडित
 
निफाड तालुक्‍यातून जाणाऱ्या 25 दिंड्यांतील वारकऱ्यांना भोजन व मुक्कांमाची ठिकठिकाणी व्यवस्था केली जाते, पण अन्नदात्यांची ही परंपरा खंडित झाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

Pune Road Project: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता; भूसंपादनासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT