nashik helmet esakal
नाशिक

भाऊ, 2 मिनिटे हेल्मेट देता का? पेट्रोल मिळविण्यासाठी शक्कल

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : स्वातंत्र्य दिनापासून शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ (no helmet no petrol) हे धोरण पोलिस आयुक्तांनी लागू केले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे हेल्मेटच्या वापरात काही प्रमाणावर वाढ झाली हे खरे असले तरी अद्यापही अनेकजण विनाहेल्मेट पेट्रोलपंपावर जाऊन संबंधितांशी विनाहेल्मेट इंधन न दिल्यास वाद घालत आहेत. ‘भाऊ, हेल्मेट घरी विसरलो, परंतु महत्त्वाच्या कामासाठी जायचे असून, गाडीत पेट्रोल नाही. त्यामुळे ते भरण्यापुरतं दोन मिनिटे हेल्मेट देता का? अशी विनंती शहरासह पंचवटीतील पेट्रोलपंपावर हेल्मेट न घातलेल्यांकडून केली जात आहे.

दुसऱ्याच्या हेल्मेटमुळे संसर्ग होऊ शकतो

पोलिसांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने पंपचालकही वर्दीच्या कारवाईच्या धास्तीने विनाहेल्मेट पेट्रोल देत नाहीत. मात्र यावर विनाहेल्मेट असलेले अनेक जण पंपाजवळ थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ‘भाऊ, पेट्रोल भरण्यापुरते दोन मिनिट हेल्मेट देता का? अशी विनवणी करत आहेत. पंचवटी कारंजाजवळ चार पेट्रोलपंपांसह पंचवटीतील दिंडोरी रोड, पेठ रोड, महामार्ग अशा सर्वच ठिकाणच्या पंपावर हीच स्थिती आहे. दुसऱ्याच्या हेल्मेटमुळे संसर्ग होऊ शकतो, या शब्दात पोलिस कर्मचारी संबंधितांची समजूत घालताना दिसतात. विशेष म्हणजे पोलिसांचे असे प्रबोधन अनेकांना लागूही पडत असल्याचे अनेक पंपावरील फेरफटक्यानंतर दिसून आले.

भाड्याने देणारे फरारी

पोलिसांच्या या मोहिमेनंतर शहरातील काही पंपांवर विनाहेल्मेट पेट्रोल विक्री सुरूच होती. परंतु कायद्याचा बडगा उगारल्यावर अनेकांनी हेल्मेटशिवायची विक्री थांबविली आहे. मात्र यावर कडी करत काहींनी पंपाजवळच पेट्रोल भरण्यापुरता हेल्मेट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. ही बाब लक्षात येताच पोलिस खात्यातील वरिष्ठांनी अशा महाभागांवर कारवाईचे आदेश दिल्याने तात्पुरती हेल्मेट भाड्याने देणाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने तेथून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT