GST latest marathi news esakal
नाशिक

सुधारित GSTची आजपासून अंमलबजावणी; नाशिकमध्ये वेबिनार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीएसटी कायद्यातील (GST Law) सुधारित करांची अंमलबजावणी सोमवार (ता. १८)पासून होत असून, याविषयी माहिती देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रॅक्टिशनर्स, करसल्लागारांचा वेबिनार होऊन त्यात बदलाची माहिती देण्यात आली.

करसल्लागार संघटनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सीए चेतन बंब प्रमुख पाहूणे होते. या बेविनारमध्ये (Webinar) वस्तू व सेवाकराबाबतच्या मोठ्या बदलाची माहिती देण्यात आली. (Implementation of revised GST from today Webinar in Nashik nashik Latest marathi news)

बदलाची माहिती देताना श्री. बंब म्हणाले, ‘वर्क्स कॉन्ट्रॅक्टर, सबकॉन्ट्रॅक्टर यांच्यावरील जीएसटी १८ टक्के झाला आहे. ई-कचऱ्यावर थेट १८ टक्के जीएसटी झाला आहे. बदललेल्या नियमांत यापूर्वी असलेली सूट देखील काढून घेण्यात आली आहे.

जीएसटी रिटर्न सलग तीन कर कालावधीत भरले नसल्यास अधिकारी जीएसटी नंबर स्थगित करू शकतात. सर्व प्रलंबित रिटर्न भरल्यानंतरच जीएसटी नंबर पुन्हा चालू होईल. आता करव्याज दंड किंवा फी भरण्यासाठी यूपीआय आणि आयएमपीएसची सेवा सुरू करण्यात आली आहे.

हॉस्पिटल्स व हेल्थ केअर सेंटर जीएसटीच्या कचाट्यात आणला गेला आहे. प्रकाश विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद किंबहुने यांनी आभार मानले. नगर, पुणे, मुंबई, सातारा, मालेगाव, जळगाव, परभणी येथील करसल्लागार वेबिनारला उपस्थित होते. नितीन डोंगरे, रंजन चव्हाण, अक्षय सोनजे, योगेश कातकाडे, भालचंद छाजेड, सतीश कजवाडकर आदींनी नियोजन केले.

...असा असेल सुधारित जीएसटी

- इलेक्ट्रिकल वाहनावर पाच टक्के जीएसटी

- वर्क्स, सबकॉन्ट्रॅक्टर १२ हून १८ टक्के

- ई-वेस्ट कचऱ्यावर पाच टक्केहून थेट १८ टक्के

- हजाराच्या कमी हॉटेल रूमबिलातील सूट रद्द

- हॉटेल बिलावर यापुढे सरसकट १२ टक्के जीएसटी

- यूपीआय, आयएमपीएसद्वारे कर, व्याज, दंड, फी भरता येणार

- बिझनेस क्लासने प्रवासासाठी करसवलत यापुढे रद्द

- रहिवासी मालमत्ता कंपनीला भाड्याने दिल्यास सवलत नाही

- ड्रेनेज सिस्टम तयार करून प्लॅट विकल्यास जीसटी

- पाच हजारांहून अधिकच्या रुग्णालय खाटेवर पाच टक्के जीएसटी

- शेती उत्पादनांवरील जीएसटी वाढवून तो १८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Katrina Kaif baby boy: मुलगा झाला रे! विकी कौशल आणि कतरिनाला पुत्ररत्न, सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हणाले..

Latest Marathi News Live Update :तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा इशारा

HF Deluxe 100cc : येणार CD 100ची आठवण! हिरोने आणली स्वस्तात मस्त बाईक; फीचर्स एकदम दमदार, डिस्काउंट ऑफर्ससह EMI फक्त 799

ठरलं तर मग! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार 'या' दिवशी उडणार, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT