winter
winter esakal
नाशिक

Nashik Winter Update : नाशिककर गारठले, पारा @9.8 अंशांवर; प्रथमच 10 अंशांखाली घसरला पारा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : दोन दिवसांपासून सुरू असलेली पाऱ्याची घसरण कायम असल्‍याने गारठ्यात कमालीची वाढ जाणवते आहे. नाशिकचे किमान तापमान यंदाच्‍या हंगामात प्रथमच दहा अंशांखाली नोंदविले गेले.

मंगळवारी (ता. १६) किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. (in nashik @9.8 degree temperature dropped below 10 degrees for first time nashik winter update )

येत्‍या आठवडाभरात पारा आणखी घसरून थंडीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. आतापर्यंत नाशिकचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहत होते. त्‍यामुळे गारठ्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्‍या नाशिकमध्ये यंदा मात्र थंडी जाणवत नव्‍हती. दोन दिवसांपासून गार वारे वाहत असल्‍याने वातावरणात गारठा निर्माण झालेला होता.

पाऱ्याची घसरण सुरूच असून, यंदाच्‍या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद मंगळवारी घेण्यात आली. जानेवारीअखेरपर्यंत वातावरणात गारवा टिकून राहणार असल्‍याचा हवामान खात्‍याचा अंदाज आहे. त्‍यामुळे पाऱ्याची आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

कमाल तापमान ३० अंशांवर

किमान तापमानात घसरण होत असताना दुसरीकडे कमाल तापमानात वाढ नोंदविली आहे. सोमवारी (ता. १५) नाशिकचे कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस नोंदविले होते. त्‍यात वाढ होऊन मंगळवारी (ता. १६) कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसाच्‍या वेळी तप्त सूर्यकिरणांचा सामना नाशिककरांना करावा लागतो आहे.

छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ नाशिक थंड

छत्रपती संभाजीनगरचे किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले असून, हे राज्‍यात नीचांकी किमान तापमान राहिले. त्‍यापाठोपाठ नाशिकचे किमान तापमान दुसऱ्या क्रमांकावर होते. अहमदनगरचे ९.६ अंश, महाबळेश्‍वरचे किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT