bharati pawar esakal
नाशिक

बाजार हस्तक्षेपमध्ये कांद्याचा समाविष्ट करा : डॉ. भारती पवार

बाजार हस्तक्षेप योजनेत कांद्याचा समावेश करून योजना लागू करावी, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांद्याचे भाव ढासळल्याने बाजार हस्तक्षेप योजनेत कांद्याचा समावेश करून योजना लागू करावी, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांना केली आहे. राज्य सरकारने कांद्याचा बाजार हस्तक्षेप योजनेत समावेश होण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. योजनेत सफरचंद, किन्नू-माल्टा, लसूण, संत्री, गालगल, द्राक्षे, मशरूम, लवंग, काळीमिरी, अननस, आले, लाल मिरची, धणे, इसबगोल, चिकोरी, मोहरी, एरंडेल पामतेल आदींची समावेश आहे. त्याप्रमाणे कांद्याचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी डॉ. पवार यांची आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत डॉ. पवार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ई-मेलद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतांकडे लक्ष देण्याची विनंती श्री. तोमर यांना केली आहे. कांद्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. देशातील ३०.०३ टक्के कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा आहे. यंदा राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, त्याचा विपरीत परिणाम बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजना लागू करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

बाजार हस्तक्षेप योजना

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत किमान किमतीत समाविष्ट नसलेल्या बागायती आणि नाशवंत शेतमालाला संरक्षण दिले जाते. नाशवंत मालाच्या किमती घसरतात, अशावेळी सरकारकडून ही योजना लागू केली जाते. राज्य सरकारच्या विनंतीवरून संबंधित मालाचे झालेले नुकसान सामायिक केले जाते. केंद्र आणि राज्य सरकार ५० : ५० टक्के हा आधार योजनेसाठी असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT