Income Tax
Income Tax  esakal
नाशिक

Income Tax Raid : बांधकाम ठेकेदारांवर प्राप्तिकरचे छापे; अनेकांचे राजकीय नेत्यांशी व्यावसायिक संबंध

सकाळ वृत्तसेवा

Income Tax Raid : शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह ठेकेदारांच्या निवास, कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी पहाटेच्या सुमारास छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रामुख्याने, शासकीय बांधकामांशी संबंधित असलेल्या ठेकेदारांचा यात समावेश असून, रात्री उशिरापर्यंत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छाननी सुरू असून, संबंधित ठेकेदारांचे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याचीही चर्चा आहे. (Income tax raids on construction contractors nashik news)

शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह शासकीय ठेकेदार असलेल्या व्यावसायिकांचे घर, फार्म हाउस, कार्यालयांवर बुधवारी (ता. ३१) पहाटेच्या सुमारास प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी छापासत्र राबविले. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी नाशिक व मुंबई पासिंग असलेल्या इनोव्हा कारचा या छापासत्रात वापर केला.

शहरातील सिटी सेंटर मॉल, गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंडित कॉलनी या परिसरातील बांधकाम व्यावसायिक व शासकीय ठेकेदारांचे घर आणि कार्यालयांना लक्ष्य करीत छापासत्र सुरू केले. संबंधितांनी कर चुकवेगिरी केल्यानेच प्राप्तिकर विभागाने छापासत्र राबविल्याचीही चर्चा आहे.

नागपूर पथकाचे नेतृत्व

प्राप्तिकर विभागाच्या नागपूर पथकाने नाशिकमधील छापासत्राचे नेतृत्व केले आहे. मंगळवारी (ता. ३०) छत्रपती संभाजीनगर येथे छापासत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या नागपूरसह मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक प्राप्तिकर विभागाच्या पथकांची संयुक्त बैठक होऊन बुधवारी (ता. ३१) पहाटे एकाच वेळी शहरातील सुमारे १४ ठिकाणी छापासत्र राबविण्यात आले.

या छापासत्रात प्राप्तिकर विभागाचे १६० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. बुधवारी (ता. ३१) रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरू होते.

राजकीय लागेबांधे

प्राप्तिकर विभागाने ज्या बांधकाम व्यावसायिकांवर छापासत्र राबविले आहे, ते सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांचे आजी-माजी खासदार-आमदारांशी व्यावसायिक संबंधही आहेत; तर काहींचे महापालिका, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय बांधकामांचे ठेकेही आहेत. त्यामुळे शहरात याबाबत वेगळी चर्चाही रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT