Accident News esakal
नाशिक

Nashik : Hit & Runच्‍या घटनांमध्ये वाढ!; दुचाकीला धडक देत वाहनचालक होताय पसार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक (जि. नाशिक) : मद्यधुंद अवस्‍थेतील प्राध्यापकाने चारचाकी वाहनाने धडक देताना धुमाकूळ घातल्‍याची घटना नुकतीच घडली. शहरातील अन्‍य विविध भागांमध्येदेखील हीट ॲन्ड रनचे प्रकार वाढले आहेत. दुचाकीस्‍वार, सायकलस्‍वारांना धडक देत वाहनचालक पसार झाल्‍याचे विविध घटनांतून समोर आले आहे. (Increase in incidence of Hit & Run in city Nashik Latest Marathi News)

पहिल्‍या घटनेत तपोवन रोडवरून दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्‍वारास धडक दिल्‍याची घटना बुधवारी (ता.१६) घडली. यासंदर्भात देवांश जोशी यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार त्‍यांचे काका चेतन जोशी (५३, रा. तारवालानगर) हे बुधवारी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास तपोवन रोडवरून जात असताना वाहनचालकाने धडक दिल्‍याने या अपघातात त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झालेली असून, गाडीचेही नुकसान झालेले आहे.

दुसऱ्या घटनेत पंचवटीतील अमृतधाम परीसरातील अपघाताबाबत रवींद्र सिंग यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्‍यानुसार त्‍यांचे भाऊ अजय सिंग (३७, रा. आंबेडकरनगर, उपनगर) हे ९ नोव्‍हेंबरला सकाळी साडेआठच्‍या सुमारास सायकलवरून तारवाला सिग्‍नलच्‍या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्‍या दुचाकीस्‍वाराने धडक देत पळ काढला. या अपघातात अजय सिंग यांच्‍या डोक्‍यास मार लागला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.

चारचाकीच्‍या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

गौळाणे फाटा परिसरात भरधाव वेगातील चारचाकीने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. १० नोव्‍हेंबरला घडलेल्‍या या घटनेसंदर्भात किरण जाधव यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्‍यानुसार किरण जाधव हे त्‍यांच्‍या पत्‍नी प्रेरणा जाधव यांच्‍यासोबत जात असताना चारचाकी वाहनाने (एमएच- १५- एचयू- ८७०८) धडक दिली. या अपघातात श्री. जाधव यांच्‍या पायाला व खुब्‍याला गंभीर दुखापत झाली असून, त्‍यांच्‍या पत्‍नीदेखील जबर मार लागला असल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT