onion import esakal
नाशिक

Onion Import : बांगलादेशकडून कांद्याची आयात खुली होण्याची भारताला प्रतीक्षा!

पाकच्या व्यापाऱ्यांचे निर्यात मूल्य कमी करण्याचे साकडे

सकाळ वृत्तसेवा

Onion Import : बांगलादेशमधील स्थानिक कांद्यामुळे १५ मार्चपासून आयात बंद करण्यात आली आहे. आता बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपला असल्याने आयात बंदी उठवण्याची प्रतीक्षा भारताला आहे.

ही बंद उठल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. (India waiting for onion import to open from Bangladesh nashik news)

दुबर्ई मार्गे मोठ्याप्रमाणात भारतीय कांदा पाकिस्तानमध्ये गेल्याने पाकिस्तानमधील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये कांद्याचे ‘बंपर' उत्पादन आले आहे.

सध्यस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला कांद्यातून डॉलर्स मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच, पाकिस्तान फळे आणि भाजीपाला निर्यातदार, आयातदार आणि व्यापारी असोसिएशनतर्फे कांद्याचे निर्यातमूल्य मूल्य करण्याचे साकडे पाकिस्तान सरकारला घालण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये कांद्याचे निर्यात मूल्य टनाला ३०० डॉलर इतके आहे. ते १६५ डॉलरपर्यंत कमी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. हे एकीकडे असताना भारतीय निर्यातदारांपर्यंत पाकिस्तानमधील हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती पोचली आहे.

पाकिस्तानमधील हवामान विभागाने जून ते जुलैमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये सामान्य पर्जन्यवृष्टीच्या तुलनेत अधिकचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जून, जुलैमध्ये पंजाबच्या दक्षिण भागामध्ये ३० टक्के, सिंध प्रांतच्या वरील पश्‍चिम भागात आणि पूर्वोत्तर बलुचिस्तान आणि सिंध प्रांतच्या दक्षिण भागामध्ये १५ ते २० टक्के अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ही माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत धडकली आहे. अशातच, सिंध प्रांतामधील मोठ्याप्रमाणात कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात येण्यास सुरवात होते. त्यामुळे अधिकच्या पावसाचा पाकिस्तानमधील कांद्याला बसणार काय? यावर विशेषतः दुबईसह अरब राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या कांद्याच्या निर्यातीचे भवितव्य अवलंबून असेल, असे भारतीय निर्यातदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निर्यातीत बांगलादेशचा ३० टक्के हिस्सा

भारतीय कांद्या निर्यातीत बांगलादेशचा हिस्सा ३० टक्क्यांपर्यंत असतो. पाकिस्तानचा कांदा बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये येण्यासाठी विलंब लागतो आणि बांगलादेशसह श्रीलंकेतील ग्राहकांच्या जिभेवर भारतीय कांद्याची चव रुळली आहे.

त्यामुळे पाकिस्तानकडून या दोन्ही देशांकडून कांदा विकत घेण्यास पसंती मिळत नाही, असा अनुभव भारतीय निर्यातदारांना आहे. बांगलादेशमध्ये पाकिस्तानचा कांदा पोचण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो.

कोलकत्ता सीमेवरून एका दिवसात भारतीय कांदा, तर नाशिकचा कांदा तीन दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये पोचतो. बांगलादेशसाठी दिवसाला भारतातून ५०० ते ७०० टन कांदा पाठवला जातो.

त्यामुळे पाकिस्तानचा कांदा मलेशिया, सिंगापूर, दुबईसह अरब राष्ट्रांमध्ये पोचला, तरीही बांगलादेश भारतीय कांद्याच्या कमी होणाऱ्या मागणीची कसर भरून काढेल.

त्याचवेळी श्रीलंकेतील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी सप्टेंबर उजाडणार असल्याने तोपर्यंत आठवड्याला ७५० ते ९०० टन भारतीय कांदा श्रीलंकेतील ग्राहकांसाठी जाईल, असे भारतीय निर्यातदार सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT