नाशिक

एम एन जी एल कंपनी कामगाराच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

CD
गुन्हे वृत्त -- कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग इंदिरानगर : गॅस कनेक्शन बसवण्यासाठी आलेल्या एमएनजीएल कंपनीच्या अनोळखी कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री रविशंकर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये कंपनीच्या गॅस कनेक्शनसाठी एक कारागीर आला होता. या इमारतीतील महिलेच्या घरातील गॅस कनेक्शन बसवल्यानंतर स्वच्छतेसाठी त्याने विम लिक्वीडची मागणी केली. त्यावेळी अनोळखी कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. -- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी इंदिरानगर : फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आणि आई- वडील व मुलाला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित संदीप निरभवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निरभवणे याने २०२२ ते जानेवारी २०२६ दरम्यान फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने पाथर्डी फाटा भागातील राहत्या घरी आणि खाजगी हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतले. ते व्हायरल करण्याचे आणि आई- वडील व मुलाला मारण्याची धमकी दिली. -- एपिके फाईलद्वारे दीड लाख गायब इंदिरानगर : एमएनजीएल कंपनीची अपडेट म्हणून आलेली एपीके फाईल डाऊनलोड केल्याने लीलाधर जनार्दन पाटील (रा. संपदा अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे दीड लाखाची रक्कम गायब झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांना १० नोव्हेंबरला दुपारी १२.४५ वाजता ही एपीके फाईल व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाली. ती त्यांनी उघडली. त्यानंतर १ वाजून १३ मिनिटांनी त्यांच्या उपरोक्त बँकेच्या क्रेडिट कार्डमधून ओटीपीद्वारे १ लाख ४८ हजार ८६९ रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akwan: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती; ‘अक्वान’मुळे मुसळधार पावसाचा इशारा

Pune Nashik Highway: चंदनापुरी घाटात आठ वाहनांचा अपघात ;महामार्गावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ahilyanagar News: कारची सायकलला धडक; दोन मुलांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जुहू चौपाटीवर छटपूजेची जय्यत तयारी; समुद्रकिनाऱ्यावरील पूजेवरून राजकीय वाद कायम

Anna Hazare : नशामुक्त भारत अभियान तळागाळात पोहोचविण्याबाबत अण्णा हजारे आणि सुमित सिंह यांच्यात राळेगण सिद्धीत सखोल चर्चा

SCROLL FOR NEXT