Necklaces for sale on the occasion of Holi, Kade esakal
नाशिक

Holi Festival : होळीची खरेदी करताना महागाईचे चटके! प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : होळी सणानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. हलव्याचे हार- कडे यांच्यासह गौरी अशा विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहे. होळीची खरेदी करताना यंदा महागाईचे चटके अधिक प्रमाणात सहन करावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सणावर विविध प्रकारचे निर्बंध आले होते. निर्बंध हटल्याने यंदा सर्वच सण उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहे. (Inflation hits while shopping for Holi increase in prices of each commodity nashik news)

होळी सणानिमित्त नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. हलव्याचे हार, कडे, नारळ, गवऱ्या, रांगोळी, रंग अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस आल्या आहे.

होळी साजरी करताना नागरिकांना होळीपेक्षा महागाईचे चटके अधिक सहन करावे लागत आहे. गॅस सिलिंडर, साखर, तेल अशा सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या दरांमध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ झाली आहे.

होळीच्या काही दिवसअगोदरच सिलिंडरच्या दरांमध्ये पन्नास रुपयांनी आणखी वाढ झाल्याने महागाईत अधिकच भर पडली आहे. सण असल्याने साजरा करणे आवश्यकच आहे. या हेतूने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

असे जरी असले तरी खरेदीवर मात्र परिणाम झाला आहे. नागरिकांकडून केवळ ५० टक्के खरेदी केली जात आहे. अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या. तसेच, महागाईमुळे किलोवर विक्री होणारे हलव्याचे हार, कडे यंदा नगावर विक्री होत आहे.

वीस ते पन्नास रुपये नग हार, तर कडे ४० ते ५० रुपये नग त्याचप्रमाणे हलव्याचा नारळ ५१ रुपयापासून ते १०१ रुपयांपर्यंत विक्री होत आहे. सरासरी विचार केल्यास प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच, १० ते ३० रुपये गौरी विक्री होत आहे. रंगांच्या दरांमध्येही चांगलीच वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.

महागाईमुळे प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, पाडव्यास आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. खरेदी विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे." - आश्विन गांगुर्डे, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT