Initiative of Tribal Finance and Development Corporation conservation to prosperity standard of living of tribals nashik sakal
नाशिक

आदिवासींचे उंचावणार जीवनमान

जैवविविधता क्षेत्रातील संस्थांकडून शबरी महामंडळाने मागविले प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना, त्यांच्या भागातील उपजीविकेची साधन आणि उपलब्ध जैवविवाधितेच्या माध्यमातून ‘संवर्धनातून समृद्धीकडे’ नेत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळने पुढाकार घेतला आहे. यासाठी जैवविविधता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

राज्यातील दुर्गम डोंगर-दऱ्यांमध्ये राहणारे आदिवासी नागरिक हे स्वत:च्या पायावर उभे राहावेत, यासाठी आर्थिक मदत म्हणून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यामातून अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या आर्थिक विकासासाठी व कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. पिके, औषधी वनस्पती, प्राणी, झाडे, पक्षी अशी जैवविविधता महाराष्ट्रातील आदिवासी भागात मुबलक प्रमाणात आढळते. लोकहभागातून याचे संवर्धन व व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शबरी महामंडळाकडून आदिवासी भागातील स्थानिक जैविक संसधानाचे संरक्षण व संवर्धन यासारखे प्रकल्प तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक कोटी रूपयांचा निधीदेखील महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी महामंडळाकडून आदिवासी बहुल भागात जैवविविधता क्षेत्रात कार्यरत नामांकित संस्थांकडून सविस्तर प्रकल्प प्रस्ताव मागविण्यात येत आहे. हे प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत स्वीकारले जातील. या उपक्रमांची सविस्तर माहिती आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या संस्था करू शकतात अर्ज

कंपनी कायद्यांतर्गत तयार झालेली सार्वजनिक कंपनी, वन-धन केंद्र समूहांतर्गत स्थापन झालेले आदिवासींचे गट, एफआरए कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी ग्रामसभा व ग्रामसभांचे समूह.

या क्षेत्रांत होणार काम

कृषी, वनस्पती, प्राणी, गौण वनोपज, गवताळ, जल, मत्सय, दुर्मिळ औषधी प्रजाती, तसेच औषधी पुनर्निमिती व पुनर्जीवन, जैवविविधता या विषयांवर आदिवासी बहुल क्षेत्रातील संस्थांकडून प्रस्ताव मागिविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT