Phalke Smarak esakal
नाशिक

आयुक्तांकडून फाळके स्मारक सुरू करण्याच्या सूचना | Nashik

विनोद बेदरकर

नाशिक : फाळके स्मारक लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या. श्री. पवार यांनी शुक्रवारी (ता. ८) महापालिकेचा खत प्रकल्प, फाळके स्मारक (Phalke smarak) व बौद्ध स्मारकाची पाहणी केली.

महापालिका आयुक्त पवार यांच्यासमवेत उपायुक्त मनोज घोडे पाटील, शहर अभियंता नितीन वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, बाजीराव माळी, विभागीय अधिकारी मयूर पाटील आदी उपस्थित होते.

खत प्रकल्पात शहरातील जमा होणारा कचरा व त्या कचऱ्यावर होणारी प्रक्रिया व त्यातून निर्माण होणाऱ्या खत प्रक्रिया व कचऱ्यापासून बनविण्यात येणाऱ्या बायोमास ब्रिकेटची माहिती घेतली. प्लॅस्टिक व इतर कचरा विलिगीकरणाची पाहणी केली. तसेच वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पीपीपीच्या माध्यमातून करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजनाचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी दिली. शहरातील नागरिक ओला व सुका कचरा शंभर टक्के वर्गीकरण करूनच घंटागाडीत देतील, याची खात्री घनकचरा व्यवस्थापन विभागाने करावी. उद्यान, मैदाने, मोठ्या सोसायटीत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करावी.

यामुळे कचरा वाहतूक व प्रक्रियेवरील खर्च कमी होईल. शहरातील मोठमोठ्या सोसायटींनी होम कम्पोस्टींगद्वारे ओला कचऱ्यावर प्रक्रिया करावी. त्यातून मिळणाऱ्या खताद्वारे स्वत:चे उद्यान अथवा झाडे विकसित करू शकतील. खत प्रकल्पावर येणाऱ्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यात आले, तर लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आपोआप कमी होऊन आपणास अधिकाधिक जागा वापरास उपलब्ध होईल, असेही सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या फाळके स्मारकाची पाहणी करण्यात आली. हा प्रकल्प त्वरित नागरिकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना शहर अभियंता नितीन वंजारी यांना दिल्या. झाडांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून त्याच ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली. स्मारकातील व्हिडिओ, ऑडिओ, म्युझिक प्रोजेक्टर, प्रदर्शन हॉल, मिनी थिएटर, बौद्ध स्मारक व परिसराची पाहणी श्री. पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT