Modi Government Vikasit Bharat Sankalp Rath File Photo esakal
नाशिक

Viksit Bharat Sankalp Yatra: विकसित भारत संकल्प यात्रा रोखल्यास गुन्हे दाखल करा : जलज शर्मा यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Viksit Bharat Sankalp Yatra : केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ काही गावांमध्ये अडविले जात आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ज्या गावात रथ अडविला जाईल, तेथे अडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश दिले आहेत.

संकल्प यात्रा सर्व ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. (Jalaj Sharma instructions to File case if Viksit Bharat Sankalp Yatra is blocked nashik news )

आतापर्यंत एक हजार ३८८ पैकी ५४६ ग्रामपंचायतींतर्गत गावांमध्ये यात्रा पोहोचली आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी यात्रेचे ढिसाळ नियोजन होत असल्याचे सांगत प्रशासनाच्या उणिवा निदर्शनास आणून दिल्या. दुसरीकडे गावा-गावांमध्ये यात्रा जात असताना काही गावांमध्ये यात्रेला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे.

देवळा तालुक्यात सात दिवस रथ येऊ दिला नाही. तर, येवला व निफाड तालुक्यांमधील काही गावांमध्ये यात्रेला कडाडून विरोध झाला. कांद्यावरील निर्यातबंदी केल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. केंद्र सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून यात्रेचे आयोजन केले आहे. मात्र, त्यास विरोध होत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली.

त्यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी मंगळवारी (ता. १९) व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे यात्रेचा आढावा घेतला. या वेळी नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ उपस्थित होत्या. पडोळ यांनी जिल्ह्यातील यात्रेचा सविस्तर आढावा सादर केला.

ग्रामपंचायतींत यात्रा पोहोचल्यावर त्यांचे केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोडही केले जात असल्याचे सांगितले. गावांमध्ये यात्रा रोखली जात असून, त्यांची कारणे ही प्रशासकीय नसून राजकीय आहेत. यात्रा ही केंद्र सरकारची असल्याने गावांतील लोकांनी ती रोखता कामा नये.

ज्यांचा विरोध आहे, त्यांनी यात्रेत सहभागी होऊ नये, असे सांगत, यावरही यात्रा रोखली गेल्यास रोखणाऱ्यांविरुद्ध संबंधित प्रांत, तहसीलदार, तलाठी यांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

५४६ ग्रामपंचायतींत पोहोचली यात्रा

जिल्ह्यातील एक हजार ३८८ पैकी आतापर्यंत ५४६ ग्रामपंचायतींतर्गत गावांमध्ये ही यात्रा पोचली आहे. तालुकानिहाय (कंसात ग्रामपंचायतींची संख्या) ः सिन्नर (२५), त्र्यंबकेश्वर (३४), चांदवड (२५), पेठ (३३), दिंडोरी (६८), नांदगाव (२१), येवला (१९), कळवण (६८), निफाड (१९), सुरगाणा (६१), मालेगाव (३४), इगतपुरी (४६), नाशिक (२५), बागलाण (५८), देवळा (१०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT